Viral video: जंगलातील सर्वात मोठा शिकारी म्हणून वाघाला ओळखलं जातं. त्याच्या हातात आलेली शिकार सहसा सुटत नाही. वाघ, बिबट्या यांसारखे भयानक प्राणी देखील वाघाला घाबरतात. तुम्ही वाघाने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. त्याच्याच तोडीस तोड वाघीणही मागे नसते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वाघीणीच्या आयुष्यातले शेवटचे दिवस आणि त्याची अवस्था पाहून तुमच्याही पाया खालची जमीन सरकेल. म्हणूनच आयुष्यात कधीच ताकदीचा गर्व करू नका, एक दिवस असाही येतो. वाघिणीची अवस्था पाहून म्हणाल आयुष्यात अंतिम सत्य हेच आहे.
प्राण्यांचे बरेच फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. अशा व्हिडीओंना नेटकऱ्यांची नेहमीच पसंती असते. सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. एका वाघिणीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. विशेष बाब म्हणजे, ही वाघीण आपल्या आयुष्यातील शेवटची चाल चालत होती. ती इतकी वृद्ध झाली होती की धड उभं राहण्यासाठीसुद्धा तिच्याकडे पुरेशी ताकद उरलेली नव्हती. काही वेळातच त्या वाघिणीचा मृत्यू झाला. ती शेवटची चाल पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
मृत्यूपूर्वी वाघिणीने केला शेवटचा वॉक
हा व्हिडीओ रणथंबोर नॅशनल पार्कमधील आहे. या व्हिडीओमध्ये झळकणारी वाघीण ऍरोहेड (T-84) हिचं मंगळवारी, १७ जून रोजी निधन झालं. ती १४ वर्षांची होती, म्हणजे माणसाच्या तुलनेत साधारणतः ७० ते ७५ वर्षांची होती. गेली काही वर्ष ती कर्करोगाशी झुंज देत होती. वन विभागाने तिच्यावर उपचारही केले, पण अखेर तिची प्राणज्योत मालवली.ऍरोहेड ही जंगलातील अत्यंत सुंदर वाघिण म्हणून ओळखली जायची. तिची एक झलक पाहण्यासाठी शेकडो पर्यटक तासंतास जंगलात वाट पाहत बसलेले असायचे. हा व्हिडीओ वन्यजीवन छायाचित्रकार सचिन राय यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला होता. या व्हिडीओनंतर अवघ्या काही तासांत वाघीण ऍरोहेडचा मृत्यू झाला, त्यामुळे सचिन राय सुद्धा खूप भावूक झाले होते.
पाहा व्हिडीओ
असं म्हणतात पैसा, सौदर्य, ताकद प्रत्येकाला मर्यादा असते. एक दिवस हे सगळं संपणार आहे हेच या व्हिडीओमधून समोर आलं आहे. लोकांना कायमच वन्य जीवनाविषयी कुतुहल असतं. प्राण्यांना पहायला आणि त्यांच्याविषयी जाणून घ्यायला अनेकजण तयार असतात. पण प्राण्यांचंही आयुष्य काहीसं आपल्यासारखंच असतं. जस माणसाला जगताना संघर्ष करावा लागतो तसंच प्राण्यांनाही रोजच्या आयुष्यात संघर्ष करावा लागतो. जन्म आहे तसा मृत्यू आहे तसंच प्राण्यांचंही आहे. तसे तर वाघाला जंगलाचा राजा म्हणतात. जंगलातील सर्व प्राणी ज्याला घाबरतात आणि वाघाची गर्जना ऐकूनच ते प्राणी जंगलातून आपला मार्ग बदलतात. मात्र हाच वाघ किंवा वाघीण म्हातारा झाल्यावर दुबळे होतात. वाघ हा जंगलाचा राजा आहे, हे सर्वांना माहीत आहे. वाघ, ज्याला राजा म्हटले जाते, त्याच्या शेवटच्या काळात अत्यंत वाईट परिस्थितीत पडतो आणि त्याच्याकडे म’रण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो. याचाच व्हिडीओ समोर आला आहे.