Trending Viral Video Highlights Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर

Live Updates

Trending News Highlights Updates, 25 April 2025 : आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर

 

17:38 (IST) 25 Apr 2025

आयुष्यात कधी असं सार्वजनिक शौचालय पाहिलं नसेल; Video पाहून लोकांना हसू आवरणं झालं कठीण

Unique Public Toilet Video : हे शौचालय बांधताना प्रायव्हसी नावाच्या कोणत्याही गोष्टीचा विचार केला गेला नसल्याचे स्पष्ट दिसतेय. ...सविस्तर बातमी
17:32 (IST) 25 Apr 2025

पाकिस्तानात काहीही घडू शकते! चोर आला, ठाण्यात घुसला, पोलिसांबरोबर बोलला अन् केलं असं की लगेच ठाण्यात गोंधळ उडाला, घडलं काय?

Pakistan Shocking Incident Goes Viral: पाकिस्तानातील कराची शहरात वाढत्या रस्त्यावरील गुन्हेगारीची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे ...वाचा सविस्तर
17:00 (IST) 25 Apr 2025

Indian Airforce Terror Attack| पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाचा युद्धसराव राफेल आणि SU-३० चा सराव

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाचा युद्धसराव राफेल आणि SU-३० चा सराव

https://www.youtube.com/shorts/PE0bZDG8lb8

16:58 (IST) 25 Apr 2025

दिल्ली मेट्रोमध्ये हनी सिंगच्या गाण्यावर नाचू लागल्या तरुणी, Viral Video

दिल्ली मेट्रो नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. यावेळी दिल्ली मेट्रोचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये कोणताही भांडत नाहीये किंवा कोणीही स्टंट बाजी करत नाही. व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांना प्रश्न पडेल कि ही दिल्ली मेट्रो आहे की हनी सिंगचे कॉन्सर्ट आहे? सविस्तर वाचा

16:56 (IST) 25 Apr 2025

पहलगाम दहशतवादी हल्ला, दिल्लीत आज कडकडीत बंद! | Delhi Bandh | Pahalgam Terrorist Attack

पहलगाम दहशतवादी हल्ला, दिल्लीत आज कडकडीत बंद! |
https://www.youtube.com/shorts/oizUoXXO0tk

16:55 (IST) 25 Apr 2025

पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयात मागवला केक। Pakistan High Comission

पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयात मागवला केक

https://www.youtube.com/shorts/RCVz8H1ChBE

16:02 (IST) 25 Apr 2025

J& K Pahalgam Attack: हल्ल्यानंतर भारतीय सैन्याला बघूनही लोकांच्या मनात भीती। पहलगाम

J& K Pahalgam Attack: हल्ल्यानंतर भारतीय सैन्याला बघूनही लोकांच्या मनात भीती। पहलगाम

https://www.youtube.com/shorts/_vL5bPzSV3Q

15:50 (IST) 25 Apr 2025

Pahalgam Terror Attack | डोळ्यात अश्रू आणि आठवणी, विनय नरवाल यांना पत्नीकडून शेवटचा सॅल्यूट

Pahalgam Terror Attack | डोळ्यात अश्रू आणि आठवणी, विनय नरवाल यांना पत्नीकडून शेवटचा सॅल्यूट

https://www.youtube.com/shorts/Q5ArLgXaTYU

15:48 (IST) 25 Apr 2025

Pahalgam Terrorist Attack: फडणवीस डोंबिवलीत; दहशतवादी हल्ल्यातील मृतांना वाहिली श्रद्धांजली

Pahalgam Terrorist Attack: फडणवीस डोंबिवलीत; दहशतवादी हल्ल्यातील मृतांना वाहिली श्रद्धांजली

https://www.youtube.com/shorts/f-cArXav99w

15:47 (IST) 25 Apr 2025

Terror Attack | जीव वाचावा म्हणून कपाळावरच्या टिकल्या काढल्या, गणबोटेंच्या पत्नींनी सांगितला थरार

Pahalgam Terror Attack | जीव वाचावा म्हणून कपाळावरच्या टिकल्या काढल्या, गणबोटेंच्या पत्नींनी सांगितला थरार

https://www.youtube.com/shorts/RfAYW6vNxK0

15:46 (IST) 25 Apr 2025

"आम्ही जीवाची बाजी लावू पण.. काश्मीरच्या रहिवाशांची देशवासियांना भावुक हाक। J&K Attack| Kashmir

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि महाराष्ट्रासह देशभरातले २६ पर्यटक या हल्ल्यात मारले गेले. पहलगाम या ठिकाणी जे पर्यटक मारले गेले त्यात महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा समावेश होता. या भीषण हल्ल्यानंतर काश्मिरी पर्यटनावर प्रचंड परिणाम होण्याची शक्यता आहे. अशातच ज्यांनी पर्यटकांना हल्ल्याच्या वेळी मदतीचा हात दिला त्या काश्मिरी रहिवाशांनी भावुक होत आपली बाजू मांडली आहे.

https://www.youtube.com/watch?v=JxHkkguZvUk

14:44 (IST) 25 Apr 2025

Terrorist Asif Sheikh House Exploded: पोलीस तपासादरम्यान आसिफ शेखच्या घरात झाला स्फोट

पहलगाममधील हल्ल्यातील संशयित दहशतवादी आसिफ शेखच्या घरात स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी पोलीस आणि एनआयएचं पथक तपासासाठी गेलेलं असताना आसिफच्या घरात स्फोटकं आढळली. त्याच दरम्यान हा स्फोट झाला असून यामध्ये जीवितहानी झालेली नाही.

https://www.youtube.com/watch?v=W1qj1-dGgW4

14:40 (IST) 25 Apr 2025
दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकार ॲक्शन मोडवर , पाकिस्तानात जाणारं पाणी अडवलं

जम्मू - काश्मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानसोबतच्या काही निर्णयावर कठोर भूमिका घेऊन बंधनं आणली आहेत, त्यात महत्वाचा म्हणजे सिंधू करार..... भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू करार रद्द केला असून, त्यानंतर सलाल आणि बगलिहार धरणातून पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याला अडवण्यात आले आहे

https://www.youtube.com/watch?v=6Gj83zsKKuc

14:38 (IST) 25 Apr 2025
“गोळ्या झाडल्यानंतर माझ्या वडिलांचं डोकं रक्ताने माखलं होतं, माझा हात…”; डोंबिवलीच्या हर्षल लेलेने सांगितला घटनाक्रम

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि महाराष्ट्रासह देशभरातले २६ पर्यटक या हल्ल्यात मारले गेले. पहलगाम या ठिकाणी जे पर्यटक मारले गेले त्यात महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा समावेश होता. या सहापैकी तीन जण डोंबिवलीचे होते. अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी या तीन मावस भावांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. यानंतर संजय लेलेंचा मुलगा हर्षल याने या हल्ल्याचा थरार सांगितला. जोशी, लेले आणि मोने कुटुंबाने पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी त्यांना काय सहन करावं लागलं ते सांगितलं.

वाचा सविस्तर

https://www.youtube.com/watch?v=8L-4n4rcmSk

14:35 (IST) 25 Apr 2025

Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर सेलिब्रेशन? पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक घेऊन जातानाचा Video आला समोर

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. भारताने पाकिस्तानी लष्करी राजदूतांना ‘पर्सोना नॉन ग्राटा’ म्हणजेच देश सोडण्याची नोटीस बजावली आहे. यादरम्यान ही नोटीस बजावण्यात आल्यानंतर काही वेळातच गुरुवारी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात एक व्यक्ती केक घेऊन जाताना पाहायला मिळाला. सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात बॉक्स घेऊन जाताना दिसत आहे. अधिक वाचा

14:28 (IST) 25 Apr 2025

Video : पुण्यातल्या बस कंडक्टरने दाखवली माणुसकी! प्रवाशांना पाणी पिता यावे, म्हणून चक्क अर्ध्या रस्त्यात थांबवली बस, व्हिडीओ होतोय व्हायरल

Pune Bus Conductor Video : या व्हिडीओमध्ये एक पुणेरी कंडक्टर काका चक्क बस थांबवून प्रवाशांना थंड पाणी बाटलीमध्ये भरून देताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. ...अधिक वाचा
14:22 (IST) 25 Apr 2025

थरारक! साक्षात समोर मृत्यू उभा असताना... थोडक्यात बचावले पर्यटक, अस्वलाने स्पीड बोटचा पाठलाग केला अन्... पाहा Video

Viral Video: अलिकडेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक अस्वल स्पीड बोटचा पाठलाग करताना दिसत आहे. ...सविस्तर बातमी
13:23 (IST) 25 Apr 2025

Pahalgam Attack : “ही माझी भूमिका…”, सुनील शेट्टीचा ‘केसरी वीर’ पाकिस्तानात होणार नाही प्रदर्शित; निर्मात्याचा खुलासा

सुनील शेट्टीचा आगामी चित्रपट ‘केसरी वीर : लेजेंड्स ऑफ सोमनाथ’ सध्या चर्चेत आहे. पण, सुनील शेट्टीचा हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नाही. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चित्रपट निर्माते कानू चौहान यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. सुनील शेट्टीचा हा चित्रपट १६ मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सविस्तर वाचा

13:07 (IST) 25 Apr 2025

Pahalgam Terror Attack : "माझ्या नवऱ्याला गोळी मारल्यानंतर दहशतवादी हसत होता" पहलगाम हल्ल्यात मृत पर्यटकाच्या पत्नीने सांगितली आपबीती

Pahalgam Attack Victim Shailesh Kalathiya's Wife : या हल्ल्यात अनेक लोकांनी आपला जीव गमावला. यापैकी एक होते शैलेश कलाथिया. शैलेश कलाथिया यांच्या पत्नीने माध्यमाशी बोलताना घडलेल्या घटनेविषयी सांगितले. त्यावेळी त्यांनी एक अशी गोष्ट सांगितली की ऐकल्यानंतर कोणाच्याही अंगावर काटा येईल. ...वाचा सविस्तर
12:33 (IST) 25 Apr 2025

आयुष्यात कधी हरल्यासारखं वाटेल तेव्हा 'हा' VIDEO बघाच; १० रुपयांसाठी फेरीवाल्याची तारेवरची कसरत पाहून तुमच्याही डोळ्यांतून येईल पाणी

Viral Video : पैसा ही एक अशी गोष्ट आहे की, जो कमवण्यासाठी आपण दिवसातील जास्तीत जास्त वेळ खर्च करतो. पण, काही जणांना पैसे कितीही कमावला तरी बहुतेकांना समाधान मिळत नाही. ...सविस्तर वाचा
12:09 (IST) 25 Apr 2025
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्याचा सिनेमा भारतात रिलीज होणार? ‘अबीर गुलाल’बद्दल मोठी अपडेट समोर

Pakistani Actor Fawad Khan Film Abir Gulaal : जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या आगामी ‘अबीर गुलाल’ चित्रपटाला खूप विरोध होत आहे. सोशल मीडियावर लोक या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. आता सरकारने या चित्रपटाबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट आता भारतात प्रदर्शित होणार नाही.

फवाद खान व वाणी कपूर (Vaani Kapoor) यांच्या चित्रपटाचं नाव ‘अबीर गुलाल’ आहे. हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार अशी चर्चा होती, मात्र आता तसं होणार नाही. हा चित्रपट ९ मे रोजी रिलीज होणार आहे.

सविस्तर वाचा

11:58 (IST) 25 Apr 2025
“पाकिस्तानबरोबर…”, पहलगाम हल्ल्यानंतर पुष्कर जोगने ICC अन् BCCI ला केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “आता पुरे झालं…”

Actor Pushkar Jog Reaction On Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध केला जात आहे. याप्रकरणी भारतासह जगभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बॉलीवूडसह मराठी कलाकारांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर करत या दहशतवाद्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता पुष्कर जोगने या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना एक पोस्ट लिहिली आहे.

सविस्तर वाचा

11:54 (IST) 25 Apr 2025
VIDEO: “जय महाराष्ट्र…”, निकोलस पुरन मुंबईत पोहोचताच बोलू लागला मराठी, लखनौच्या मराळमोळ्या खेळाडूने शिकवलं

IPL 2025 Nicholas Pooran Video Marathi MI vs LSG: मुंबई इंडियन्सचा पुढील सामना लखनौ सुपर जायंट्स संघाविरूद्ध होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडिमयवर दुपारी खेळवला जाणार आहे. या सामन्याकरता लखनौचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतरचा निकोलस पुरनचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे सविस्तर वाचा

11:53 (IST) 25 Apr 2025

Pahalgam Terror Attack : "काश्मीर खराब नाही, सरकारची सिक्योरिटी खराब होती"; हल्ल्यात पतीला गमावलेल्या महिलेने सरकारवर केली टीका, Video Viral

Shailesh Kalathiya wife Shital Kalathiya : सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मृतक शैलेश कडातिया यांच्या पत्नीने सरकारविरोधात रोष व्यक्त केला आहे. त्या काय म्हणाल्या, जाणून घेऊ या. ...अधिक वाचा
11:51 (IST) 25 Apr 2025

VIDEO: बहिणीच्या आनंदाश्रूंनी सगळं सांगितलं! मेंढरं राखणारा पोरगा आता सायब झाला; IPS बिरदेव ढोणेच्या स्वागताला अख्खा गाव रडला

Birdev Siddapa Done: मेंढरं राखणारा पोरगा आता सायब झाला; IPS बिरदेव ढोणेच्या स्वागताला अख्खा गाव रडला ...वाचा सविस्तर
11:48 (IST) 25 Apr 2025

लांबून दहशतवादी दिसताच त्यांनी पळ काढला अन् ते थोडक्यात बचावले; पहलगाममधल्या हल्ल्याचा आणखी एक भयानक VIDEO समोर

Pahalgam Terror Attack video: काश्मीर खोऱ्यात पर्यटनाचा आनंद घेत असलेल्या नागरिकांना अचानक घेरून दहशतवाद्यांनी अमानुषपणे जीव घेतले. पहलगामच्या बैसरन घाटीत सोमवारची संध्याकाळ अचानक दहशतीत बदलली. पर्यटक मिनी स्वीत्झर्लंडमधून बाहेर येताच २० फूट अंतरावरून गोळीबार सुरू झाला. तब्बल २६ पर्यटकांचा यात मृत्यू झाला. या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतरचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

सविस्तर वाचा

11:42 (IST) 25 Apr 2025

“माझ्या मुलांना काही करु नका” भारतीय लष्कराला पाहताच पर्यटकांनी फोडला टाहो, जोडले हात; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

Jammu and Kashmir Pahalgam Terror Attack Tourist Viral Video : जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल २७ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. बैसरन पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून ठार मारले. या घटनेचा आता देशभरातून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर आता पर्यटकांचा एक काळीज पिळवटून एक व्हिडीओ समोर आला आहे.

सविस्तर वाचा

11:39 (IST) 25 Apr 2025

भारतीय सैन्याची नियंत्रण रेषेवर पाकिस्तानविरोधात कारवाई? VIRAL VIDEO नेमका कधीचा; वाचा, सत्य

Fact Check Viral Video: लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आलेला एक व्हिडीओ आढळला, ज्यामध्ये पोलिस एका गटाला मारहाण करताना दिसत आहेत. त्याद्वारे पोलिस मुस्लिमांच्या गटाला मारहाण करीत असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण, तपासादरम्यान, आम्हाला आढळले की, हा व्हिडीओ जुना आहे आणि पोलिस समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करताना दिसत आहेत.

सविस्तर वाचा

10:25 (IST) 25 Apr 2025

याला म्हणतात लावणीचा ठसका; मराठी मुलींचा हलगीच्या तालावर जबरदस्त डान्स, VIDEO पाहून सगळेच झाले फॅन

मराठी मुलींचा हलगीच्या तालावर जबरदस्त डान्स, VIDEO पाहून सगळेच झाले फॅन ...वाचा सविस्तर
09:30 (IST) 25 Apr 2025
Pahalgam Terror Attack : ‘नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीशी खोटं बोललो’, एटीव्ही ऑपरेटरने सांगितली आठवण; पाहा Video

Terror Attack Jammu And Kashmir : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात नौदलाचे अधिकरी विनय नरवाल यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी गोळी घातल्यानंतर नरवाल यांना एक स्थानिक एटीव्ही ऑपरेटर इरशाद अहमद यांनी मदत केली होती. ज्याबद्दल माहिती देताना अहमद यांनी एक खुलासा केला आहे. त्यांनी आपण दाम्पत्याची रुग्णवाहीकेपर्यंत पोहचण्यासाठी मदत करत असताना विनय नरवाल यांच्या पत्नीशी खोटं बोललो असे अहमद यांनी सांगितले आहे. त्यांचा व्हिडीओ सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहेत

सविस्तर वाचा

Hand holding smartphone social media concept

Lifestyle and Trending Highlights in Marathi : सोशल मीडियावर कोणते ना कोणते व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर