VIDEO : बोबड्या भाषेत अ‍ॅलेक्साला कमांड देणाऱ्या चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल

आजच्या सुपरफास्ट युगात लहान मुलं नव नव्या टेक्नॉलॉजीसोबत खूप लवकर फ्रेंडली होत असतात. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीसोबत रमताना त्यांची निरागसता पाहून साऱ्याच जणांचं मन पिघळून जातं. त्यांची धमाल मस्ती पाहून दिवसभराचा थकवा सुद्धा दूर होतो. असाच हा व्हिडीओ एकदा नक्की पाहा.

small-boy-dancing-alexa-song-viral video
(Photo: Instagram/ tintinkabacha)

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. वेगवेगळ्या डान्सचे तर अनेक व्हिडीओ या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात येत असतात. सध्या एका चिमुकल्याचा असाच एक मजेदार आणि मूड फ्रेश करणारा डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आजच्या सुपरफास्ट युगात लहान मुलं नव नव्या टेक्नॉलॉजीसोबत खूप लवकर फ्रेंडली होत असतात. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीसोबत रमताना त्यांची निरागसता पाहून साऱ्याच जणांचं मन पिघळून जातं. त्यांची धमाल मस्ती पाहून दिवसभराचा थकवा सुद्धा दूर होतो. सध्या व्हायरल होणाऱ्या एका चिमुकल्याचा हा व्हिडीओ पाहून तुमचा सुद्धा मूड फ्रेश होईल. या निरागस मुलाचा हा व्हिडीओ एकदा नक्की पाहा.

आपल्या देशात नव नव्या टेक्नॉलॉजी येत असतात. कोणती टेक्नॉलॉजी कशी वापरायची ? हे सुरूवातीला भल्या भल्या माणसाला सुद्धा कळत नाही. मात्र, सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा काही एखाद्या माणसाचा नाही. तर हा व्हिडीओ एका छोट्या मुलाचा आहे. या चिमुकल्याची हूशारी नेटकऱ्यांना चांगलीच भावली आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकला मुलगा घरात सोफ्यावर उभा असलेला दिसून येतोय. बाजुला ठेवलेल्या अ‍ॅमेझॉनच्या अ‍ॅलेक्साला त्याचं आवडतं सॉंग प्ले करण्यासाठी सांगतो. यात तो आपल्या बोबड्या भाषेत अलेक्साला ‘डम डम डिगा डिगा’ हे सुपरहिट सॉंग प्ले करण्यासाठी सांगत असतो. या निरागस मुलाने केलेली कमांड ऐकून अलेक्सा त्यावर रिप्लाय देते. आपण दिलेल्या कमांडवर अ‍ॅलेक्सा मशीनने दिलेला रिप्लाय ऐकून हा चिमुकला मुलगा खळखळून हसतो आणि सोफ्यावरच डान्स करू लागतो.

या चिमुकल्याची निरागस मस्ती केवळ इथेच संपत नाही. तर यानंतर तो पुन्हा एकदा त्याला आवडणारं दुसरं सॉंग प्ले करण्यासाठी सांगतो. इंग्लिश गाणं ‘बनाना बोट’ प्ले करण्याची कमांड देतो. पण या चिमुकल्याला अ‍ॅलेक्साला व्यवस्थित कमांड देणं जमत नाही. तरीही तो पुन्हा एकदा प्रयत्न करतो. पण पुन्हा त्याला व्यवस्थित कमांड देणं जमतच नाही. अखेर शेवटी तो आपल्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल देतो. या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि निखळ आनंद नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या चिमुकल्याचं नाव ‘कबीर सूद’ असं आहे. हा चिमुकला आसामचा असून Tintin Ka Bacha नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. सहा दिवसापूर्वीच हा व्हिडीओ इन्स्टाग्राम शेअर करण्यात आला होता. पण चिमुकल्याचा हा निरागस आनंद पाहून हा व्हिडीओ अगदी वाऱ्यासारखा सोशल मीडियावर पसरू लागला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख २१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. तर साडे आठ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक करत काही युजर्सनी या गोड चिमुकल्या मुलाचं कौतुक केलंय.

हा व्हायरल होणारा व्हिडीओ आपला मू़ड फ्रेश करणारा आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी खुश झाले असून त्यावर मजेदार असा प्रतिक्रिया देत आहेत. तसेच या व्हिडीओला सध्या फेसबुक, ट्विटर तसेच इन्स्टाग्रामवर उत्स्फूर्तपणे शेअर केले जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Toddler asks alexa to play dum dum diga diga song in viral video internet hearts it watch prp

Next Story
पाहा: वधू आणि तिच्या भावाचा संगीत सोहळ्यातील धम्माल परफॉर्मन्सBride and brother pull of epic wedding dance , संगीत सोहळा, video goes viral , bride and her brother perform a Bollywood medley at the Sangeet, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news
ताज्या बातम्या