scorecardresearch

Premium

Heart Breaking ! हॉस्पिटलमधल्या चिमुकल्याचा हा ‘जिंदादिल’ व्हिडीओ पाहून मन हेलावून जाईल

भल्या भल्या माणसाला हॉस्पिटलमध्ये अॅडमीट व्हायच्या नावाने घाम फुटतो. पण एका लहानश्या चिमुकल्याने तर कमालच केली.

little-boy-singing-song-viral
(Photo: Twitter/ GoodNewsMovement)

हॉस्पिटल म्हटलं की तिथले पेशंट्स, मोठ मोठे मशिन्स पाहून मनात धडकीच भरते. सध्याच्या वातावरणात एका हॉस्पिटलमध्ये दाखल होणं म्हणजे भितीदायकच. भल्या भल्या माणसाला हॉस्पिटलमध्ये अॅडमीट व्हायच्या नावाने घाम फुटतो. पण एका लहानश्या चिमुकल्याने तर कमालच केली. या चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून पाहणाऱ्याचं मन हेलावून जातंय. अवघड किंवा तणावाच्या परिस्थितीमध्येही लोकांमध्ये जगण्याची किती उर्मी आणि उत्साह आहे, याचा प्रत्यय आणून देणारा हा व्हिडीओ एकदा नक्कीच पाहिला पाहीजे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये हॉस्पिटलमध्ये अॅडमीट झालेला एक लहान मुलगा बेडवर डान्स करत गाणं गाताना दिसून येतोय. या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य पाहून तुम्ही तुमच्या सर्व वेदना विसरून जाल. हॉस्पिटलमध्ये अॅडमीट झाल्यानंतर आतापर्यंत सगळ्यांच्या कपाळावर आट्या येतात. पण या चिकल्याचा हा आनंद पाहून अनेकांच्या डोळे सुद्धा पाणावू लागले आहेत. आजार कितीही मोठा असू देत त्याचा सामना इतक्या निरागसतेने सुद्धा करता येऊ शकतं, हे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कळतं.

chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada prime minister justin trudeau (1)
कॅनडाच्या पंतप्रधानांचं जी २० परिषदेवेळीच बिनसलं होतं? ‘या’ कृतीमुळे झाली होती भारतीय सुरक्षा यंत्रणेची अडचण!

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ ब्राझीलमधला आहे. या व्हिडीओमधल्या मनसोक्त गाणाऱ्या चिमुकल्याचं नाव मिगुएल असं आहे. या चिमुकल्याला गॅस्ट्रोएन्टेरिटिसने नावाचा आजार असून हॉस्पिटलमध्ये त्याच्या उपचार सुरू आहेत. बेडवर बसलेला असताना अचानक टिव्ही त्याच्या आवडीचं गाणं लागलं आणि त्यानंतर आवडीच्या गाण्यावर हा चिमुकला थिरकू लागला. डान्स करता करता तो आपल्या बोबड्या बोलीत गाणं देखील गाताना दिसून येतोय. यासाठी त्याने चमच्याचा वापर माईक म्हणून करताना दिसून येत आहेत. आवडत्या गाण्यावर डान्स करताना त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही भिती किंवा चिंता दिसून येत नव्हती.

बर्‍याच लोकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. लोकांना हा व्हिडीओ केवळ आवडतच नाही आहे, तर भयानक परिस्थितीतही हसत आजाराचा सामना करत असल्याबाबत कौतुक करत आहेत.

कठीण परिस्थितही जीवनाचा आनंद घेण्यासाठी हा चिमुकला अनेकांसाठी प्रेरणा बनलाय. तसंच उत्तं संगीत आजार बरे करते याची जाणीव देखील या चिमुकल्याने आपल्याला करून दिली आहे. या व्हिडीओ शेअर करून काही तास सुद्धा उलटले नाहीत तर आतापर्यंत ६ हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-10-2021 at 20:10 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×