Viral video: माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच गरिबी वाईट नसते, खरंतर हीच गरिबी आपल्याला लढायला शिकवते असे म्हटले जाते. सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. शिक्षणासाठी त्याची ही धडपड आणि प्रचंड इच्छाशक्ती पाहून नेटकरी तोंडभरून कौतुक करताना दिसत आहेत. एकीकडे शिक्षणाची भूक, तर दुसरीकडे पोटाची भूक अशा परिस्थितीत चिमुकल्याची कशी धडपड सुरू आहे ते पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जबाबदारी वय पाहून येत नाही

वय नाही, पण परिस्थिती आणि जबाबदारी तुम्हाला मोठं बनवते हे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात नकळत पाणी येईल. अनेक लोक आपल्या परिस्थितीवर नाराज असतात. मात्र, आजूबाजूला काही लोक असे असतात, त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांना आपण खूप सुखी असल्याची जाणीव होते. हो, कारण जगात असे अनेक लोक आहेत ज्यांची परिस्थिती गरीब असतेच. मात्र, काही मुलांवर खेळण्या-बागडण्याच्या वयात जबाबदाऱ्या येऊन पडतात. जबाबदारी ही वय पाहून येत नाही, पण एकदा आली की खांदे मजबूत करून जाते. असाच या चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, एवढ्याश्या जीवात एवढा मोठा समजूतदारपणा येतो तरी कुठून. या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता, हा चिमुकला घरातल्या चुलीशेजारी बसला आहे. यावेळी एकीकडे तो अभ्यास करताना दिसत आहे, तर दुसरीकडे तव्यावर चपाती शेकवताना दिसत आहे. सगळी जबाबदारी एकट्याच्या अंगावर आल्यानंतरही हा चिमुकला सगळं करून अभ्यास करत आहे. यावेळी त्याचा हातही भाजला आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत पुढच्याच क्षणी तो छोट्या मोबाइलवर ऑनलाइन सुरू असलेला वर्ग ऐकत अभ्यास करतोय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: ‘सिग्नल तर सुटणारच आहे पण…’ पुण्यात जीम मालकाची भन्नाट मार्केटींग; सिग्नलवरचं होर्डिंग वाचून पोट धरुन हसाल

हा व्हिडीओ mpsc_short_notes नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. “नशिबाला दोष द्यायचा नसतो मित्रा, छातीत दम ठेवत नशिबावर थेट वार करायचा असतो, त्याला बदलण्यासाठी”, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे; ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. चिमुकल्याचा समजूतदारपणा नेटकऱ्यांची मने जिंकत आहे. लेक असावा तर असा, असे म्हणत अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे; तर काही जणांनी परिस्थिती सगळं काही शिकवते, असे म्हणत त्या चिमुकल्याच्या जिद्दीला दाद दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toddlers struggle to education help family to work in farm heart touching video goes viral on social media srk
Show comments