बार्बेक्यू चिकन पिझ्झा, क्लासिक गार्लिक ब्रेड, चॉको लावा केक डॉमिनोजच्या या रेसिपीज हे प्रत्येक पार्टीसाठी बेस्ट मेन्यू आहे. अवघ्या ३० मिनिटात डिलिव्हरी करण्याचं आश्वासन देत वर्षानुवर्षे डॉमिनोजने पिझ्झाप्रेमींना आपल्यासह जोडून ठेवलं आहे. पण हा पिझ्झा नेमका बनतो कसा कधी आपल्या मनात हा प्रश्न आला का? अनेकदा प्रसिद्ध हॉटेल्सचे किचन पाहिले की तिथे जेवायची इच्छाही होणार नाही, याची अनेक उदाहरणे आपण आजवर पाहिली आहेत. यावेळी या अस्वच्छ हॉटेलच्या उदाहरणाच्या यादीत डॉमिनोजचं देखील नाव जोडलं जात आहे. साहिल कारनानी या ट्विटर युजरने शेअर केलेल्या एका फोटोनंतर या चर्चेला उधाण आले आहे.

कुत्राही तोंड लावणार नाही असं अन्न सरकार देतंय; पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

साहिलने शेअर केलेल्या फोटो मध्ये डॉमिनोजच्या पिझ्झा ब्रेड साठी मळून ठेवलेल्या कणकेच्या गोळ्यावर चक्क टॉयलेट स्वच्छ करण्याचे ब्रश लटकावून ठेवलेले दिसत आहेत. “हे असे करूनच डॉमिनोज आपल्याला ३० मिनिटात पिझ्झा पुरवतो, अत्यंत गलिच्छ” असे कॅप्शन साहिलने दिले आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट करून संताप व्यक्त केला. संबंधीत फोटो हा डॉमिनोजच्या बंगळुरू येथील दुकानातील असल्याचे सांगितलेले आहे.

पहा ट्विट

नवऱ्याला खुश ठेवायला तिला ‘अशी’ बाई हवीये.. अजब Vacancy ची गजब चर्चा

दरम्यान, काही दिवसांपूर्वी चाणक्यपुरी येथील एका कॅफेमध्ये ग्राहकाला खाण्यात मेलेली पाल आढळली होती. हा अनुभव या ग्राहकाने इंस्टाग्राम वर शेअर करून माहिती दिली होती. या प्रकरणानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी माफी मागितली मात्र अशा प्रकारे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणे हे कितपत योग्य आहे अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.