scorecardresearch

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ‘हा’ खेळाडू दिसला विणकाम करताना; व्हिडीओ व्हायरल!

आपल्या आवडत्या खेळाडूला विणकाम करताना पाहून त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. यामुळे त्याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Tom Daley was spotted knitting
हा खेळाडू शिलाई आणि क्रोशेटमध्ये मास्टर आहे. (Photo: Olympics / Twitter)

टॉम डेलीने टोक्योमध्ये महिलांच्या तीन मीटर स्प्रिंगबोर्ड डायव्हिंग फायनलमध्ये स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी आला होता. तेव्हा स्पर्धा बघता बघता टॉम विणकाम करताना दिसला. हे पाहून त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. यामुळे त्याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ग्रेट ब्रिटनचा डाइवर टॉम डेली केवळ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नाही तर शिलाई आणि क्रोशेटमध्ये मास्टर आहे. विणकामाच्या संबधित अनेक पोस्ट तो नेहमीच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत असतो. टॉमसाठी विणकाम ही कला त्याच्या खेळातही खूप मदत करते असं तो सांगतो.

नक्की काय झालं?

पुरुषांच्या सिंक्रोनाइज्ड १०-मीटर प्लॅटफॉर्म स्पर्धेत मॅटी लीसह सुवर्ण पदक जिंकणारा टॉम रविवारी टोक्यो एक्वाटिक्स सेंटरमध्ये प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये बसला होता. स्पर्धेचं शुटींग करणारा कॅमेरा अचानक टॉम डेलीकडे वळला आणि काही क्षण तिकडेच थांबला. टॉम डेलीच्या हातातील विणकामाच्या सुया आणि चेहऱ्यावर एक केंद्रित लुक त्या कॅमेऱ्यात कैद झाला. २७ वर्षीय तरुण टॉम डेलीने ‘ग्रेट ब्रिटन’ असं लिहलेलं शर्ट घातला होता आणि गुलाबी व जांभळा धागांसह विणकाम करत होता. “अरे हे? ऑलिम्पिक विजेता टॉम डेली डाइविंग पाहताना स्टँडमध्ये विणकाम करत आहे,” अधिकृत ऑलिम्पिक ट्विटर खात्याने डेलीच्या फोटो शेअर करत त्याला टॅग करत पोस्ट केलं.

टॉम डेलीची विणकामाची आवड

डेलीने यापूर्वी इन्स्टाग्रामद्वारे खुलासा केला होता की त्याने आपल्या सुवर्णपदकाचे रक्षण करण्यासाठी एक पाऊच शिवला आहे. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्याने त्याची विणकामाची आवड दाखवली आहे. डॅलीने व्हिडीओमध्ये म्हटले आहे की “विणकाम, क्रोशेट आणि शिवणकामाच्या सर्व गोष्टी मला ऑलिम्पिकसाठी प्रशिक्षण आणि स्पर्धा या संपूर्ण प्रक्रियेत समजूतदार राहण्यास मदत करते.

‘एलजीबीटी’ला सपोर्ट

टीम ग्रेट ब्रिटनच्या म्हणण्यानुसार, डेली प्रथम १४ वर्षांचा असताना २००८  च्या बीजिंग ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला, नंतर २०१२ लंडन आणि २०१६ च्या रिओ डी जानेरो गेम्समध्ये दिसला. डेलीने टोकियोमध्ये पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवले. त्यावेळी तो म्हणाला की तो तरुण एलजीबीटी लोकांना प्रेरणा देण्याची आशा करतो. “मी समलिंगी माणूस आहे आणि ऑलिम्पिक चॅम्पियन आहे हे सांगताना मला अविश्वसनीय अभिमान वाटतो.” २६ जुलै रोजी पत्रकार परिषदेत डेली म्हणाला.

तो पुढे म्हणातो की, “मला आशा आहे की तेथील कोणताही एलजीबीटी तरुण व्यक्ती हे पाहू शकेल की आत्ता तुम्हाला कितीही एकटे वाटत असले तरी तुम्ही एकटे नाही आणि तुम्ही काहीही साध्य करू शकता. इथे तुमच्या निवडलेल्या कुटुंबाचा पुरेपूर पाठिंबा तुम्हाला आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-08-2021 at 11:02 IST

संबंधित बातम्या