Tons Of Plastic Get Washed Up On Mumbai Beach : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. सकाळपासून जराही खंड न पडता सातत्याने पाऊस कोसळत आहे.सोसट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसानं मुंबईकरांची दाणादाण उडवली. या मुसळधान पाऊस कोसळत असताना मुंबईकरांना समुद्राकडूनही एक रिटर्न गिफ्ट मिळालंय. मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवरुन कित्येक टन इतका प्लॅस्टिकचा कचरा किनाऱ्यावर वाहून आला आहे. भारतात एक जुलैपासून ”सिंगल युज प्लास्टिकवर ” बंदी घालण्यात आली आहे. तरी सुद्धा काही व्यक्ती समुद्रकिनारी फिरण्यासाठी आल्यानंतर कचरा सर्रासपणे समुद्रात फेकून देतात. माझ्याकडून एक पिशवी तर फेकली तर काही बिघडत नाही, असं म्हणणाऱ्यांचे या व्हायरल व्हिडीओने सर्वांचे डोळे उघडले आहेत.

प्लास्टिक वापरावर आलेली बंदी म्हणजे आजपर्यंतच्या प्लास्टिक वापराच्या अतिरेकाची परिणती आहे. विशेषतः जलसाठे आणि जमीन यांचे पर्यावरण प्रदूषित होत चालले आहे. हवेतील प्रदूषणही वाढले आहे. नागरिकांनी सवयी बदलून आणि शासनाने लागू केलेल्या प्लास्टिक बंदी कायद्याला अनुसरून आचरण करावे. पण आजही कित्येक नागरिक सध्याच्या परिस्थितीचे भान न ठेवता सर्रासपणे प्लास्टिकचा वापर करत पर्यावरणाची हानी करत आहेत. माझ्या एकट्याने हा कचरा फेकला तर काही होत नाही, असं अनेक जण बोलून जातात. समुद्रही आतापर्यंतच्या त्रासाचं उट्ट काढायला सज्ज झाला आहे.

karma hit back on young boys who messed with the cow
Video : गायींबरोबर पंगा घेणे तरुणाला पडले चांगलेच महागात, थेट हवेत उडवले अन्…, व्हिडीओ होतोय व्हायरल
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
a father beat child for his betterment by his shoes watch viral video of fathers love
लेकाच्या भल्यासाठी वडिलांनी दिला चोप, बुटाने धू धू धुतले, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “वडिलांचे असे प्रेम…”
mundu-clad gang boys dance on lungi shirt
Video : लुंगी शर्टवर तरुणांनी केला झकास डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल

आणखी वाचा : कचऱ्यावरून महिलांमध्ये झालेल्या भांडणाचा VIDEO VIRAL, नाल्यातून गाळ काढून काय केलं पाहा…

एकीकडे मुंबईकर या कालावधीमध्ये समुद्रातून उसळणाऱ्या उंच लाटांची अनुभूती घेत असतानाच, दुसरीकडे समुद्र मात्र मुंबईकरांनी आत्तापर्यंत समुद्रात फेकलेल्या कचऱ्याचं रिटर्न गिफ्ट मुंबईकरांना देण्याची तयारी करत होता. मुंबईकरांनी एक-एक करून समुद्रात टाकलेला प्लॅस्टिकचा कचरा एकत्र करत पुन्हा साभार परत केलाय. समुद्रात उसळणाऱ्या महाकाय लाटांनी हा कचरा पुन्हा किनाऱ्यालगत आणला आहे. भरतीदरम्यान समुद्रातला काही कचरा किनाऱ्यावर वाहून येतो हे चित्र तसं फारसं नवीन नाही. मात्र या व्हायरल व्हिडीओमधलं चित्र काही औरच होतं!

आणखी वाचा : पावसाळ्यात छत्री सुकत नाही म्हणून असं करतं का कुणी? हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : तुम्ही कधी ऑक्टोपसला खेळताना पाहिलंय का? मग हा गोंडस VIRAL VIDEO एकदा पाहाच!

हा व्हिडीओ Mumbaimatterz नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलेला आहे. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. या व्हिडीओमध्ये मुंबईतील प्लॅस्टिकने भरलेल्या माहीम बीचचे विहंगम दृश्य दिसत आहे. “अरबी समुद्रातून मिळालेली रिटर्न गिफ्ट पाहण्यासाठी माहीम समुद्रकिनाऱ्यावर नागरिकांची गर्दी होत आहे,” असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहून मुंबईकरांनी आता तरी आपल्या सवयी बदलल्या पाहिजेत असं आवाहन अनेक युजर्स करत आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ट्रेन रद्द झाल्यानंतर भारतीय रेल्वेने विद्यार्थ्यासाठी कॅब बुक केली, वाचा संपूर्ण किस्सा

समुद्राने परत फेकलेल्या कचऱ्यात सर्वाधिक प्लास्टिक आणि थर्माकॉल तसेच तरंगणाऱ्या गोष्टींमध्ये चप्पल (स्लीपर) यासारख्या गोष्टी आढळल्या आहेत. शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारांमध्ये कचराही वाहून समुद्रात जातो. त्यामुळं अशा वादळाच्या वेळी समुद्र कचरा बाहेर फेकतो. म्हणून शहरातील रस्त्यांवरील कचरा गटारांमधून समुद्रात जाणार नाही यासाठी योग्य यंत्रणा असली पाहिजे, असं देखील काही युजर्स म्हणत आहेत.