Top 5 Best Selling SUVs in India March 2026: भारतीय वाहन बाजारात दर महिन्याला लाखो गाड्यांची विक्री होत असते. पण, त्यामध्ये एक सेग्मेंट असा आहे, ज्याकडे सगळ्यांचेच लक्ष असते तो म्हणजे SUV! दमदार लूक, आरामदायी प्रवास आणि मजबूत परफॉर्मन्स यांमुळे SUV गाड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पण मार्च २०२६ मध्ये नेमकं कोणत्या SUV गाड्यांनी ग्राहकांची मनं जिंकली? कोणत्या गाड्यांसाठी शोरूमवर अक्षरशः गर्दी झाली? चला, एकेक करून पाहूया…

पहिल्या क्रमांकावर ‘ही’ SUV; विक्रीचा विक्रम!

मार्च महिन्यात सर्वाधिक पसंती मिळाली ती टाटा पंच या कॉम्पॅक्ट SUV ला. या गाडीच्या पेट्रोल (ICE) आणि इलेक्ट्रिक (EV) या दोन्ही प्रकारांची मिळून तब्बल २०,९७७ गाड्यांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा १७,७१४ इतका होता. म्हणजेच या वर्षी या गाडीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाल्याचं स्पष्ट दिसतं. लहान आकार, परवडणारी किंमत आणि मजबूत बांधणी यांमुळे ही गाडी अनेकांच्या पसंतीस उतरली आहे.

दुसऱ्या क्रमांकावर ‘ही’ दमदार SUV

दुसऱ्या क्रमांकावर आहे टाटा नेक्साॅन. ही SUV देखील ग्राहकांमध्ये खूप लोकप्रिय ठरली आहे. मार्च २०२६ मध्ये या गाडीच्या १९,८१० गाड्यांची विक्री झाली. गेल्या वर्षी मार्चमध्ये हा आकडा १६,३६६ होता. सुरक्षितता, फीचर्स व परफॉर्मन्स यांमुळे ही गाडी सतत ग्राहकांना आकर्षित करत आहे.

तिसऱ्या स्थानावर ‘ही’ फेव्हरेट SUV

तिसऱ्या क्रमांकावर आहे ह्युंदाई क्रेटा. मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये ही गाडी आधीपासूनच लोकप्रिय आहे.
मार्च महिन्यात या गाडीच्या १७,८७८ गाड्यांची विक्री झाली. स्टायलिश डिझाइन, आरामदायी इंटेरियर आणि आधुनिक फीचर्समुळे ग्राहकांनी याला भरभरून पसंती दिली.

चौथ्या क्रमांकावर ‘ही’ विश्वासार्ह SUV

चौथ्या स्थानावर आहे मारुती ब्रेझा. मारुतीची ही गाडी कायमच विश्वासार्ह मानली जाते. मार्च २०२६ मध्ये या SUV च्या १६,१३० गाड्यांची विक्री झाली. जरी गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडीशी घट दिसली, तरीही ग्राहकांचा विश्वास या गाडीवर कायम आहे.

टॉप ५ मध्ये ‘ही’ SUVही सामील

पाचव्या क्रमांकावर आहे Maruti Fronx. ही गाडीही बाजारात चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. मार्च महिन्यात या गाडीच्या १५,५४० गाड्यांची विक्री झाली. मागील वर्षीच्या तुलनेत या गाडीच्या मागणीत वाढ झालेली दिसते.

शेवटी प्रश्न एकच लोकांची पसंती कोणाला?

या सर्व आकडेवारीवर नजर टाकली, तर एक गोष्ट स्पष्ट होते भारतातील ग्राहक आता SUV गाड्यांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत.
विशेषतः Tata Punch आणि Tata Nexon या गाड्यांनी बाजारात जबरदस्त पकड निर्माण केली आहे.

मजबूत बांधणी, आधुनिक फीचर्स व किफायतशीर किंमत या तिन्ही गोष्टी जिथे मिळतात, तिथे ग्राहकांची गर्दी होणारच!