Car Sales Dec 2025 : भारतीय प्रवासी वाहन (पॅसेंजर व्हेईकल मार्केट) बाजाराने २०२५ सालाचा शेवट चांगल्या गतीने केला. डिसेंबर महिन्यातील विक्रीतही हाच सकारात्मक कल दिसून आला. या काळात मारुती सुझुकीची बाजारातील पकड खूप मजबूत राहिली आणि कंपनीने आपले वर्चस्व स्पष्टपणे कायम ठेवले. महिनाभरात सर्वाधिक विकल्या गेलेल्या १० गाड्यांपैकी सात गाड्या देशातील सर्वांत मोठ्या कार मारुती सुझुकी कंपनीच्या आहेत.
या यादीत मारुती सुझुकी बलेनो आघाडीवर आहे, जिच्या २२,१०८ युनिट्सची विक्री झाली असून, प्रीमियम हॅचबॅक सेग्मेंटमधील तिची लोकप्रियता कायम आहे. या मॉडेलची डिझाईन, फीचर्स आणि सातत्यपूर्ण इंधन कार्यक्षमता यांमुळे ती स्पर्धेत पुढे राहिली आहे. त्यानंतर लगेचच मारुती सुझुकी फ्रॉन्क्सचा क्रमांक लागतो, जिच्या २०,७०६ युनिट्सची विक्री झाली आहे. त्यातून हे सिद्ध होते की, कॉम्पॅक्ट सेग्मेंटमधील क्रॉसओव्हर वाहनांचा फॉर्म्युला तरुण ग्राहकांमध्ये आणि शहरात प्रवास करणाऱ्या लोकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरत आहे.
टाटा नेक्सॉनने १९,३७५ युनिट्सच्या विक्रीसह तिसरे स्थान पटकावले आणि टाटाच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मॉडेलचा दर्जा कायम ठेवला. नवीन कंपन्या (प्रतिस्पर्धी) कडून स्पर्धा होत असूनही, नेक्सॉन आपल्या नवीन रूप, सुधारित फीचर्स व स्ट्राँग सेफ्टी क्रेडेंशियल्स ग्राहकांना आकर्षित करत आहेत. यादरम्यान, मारुतीची सबकॉम्पॅक्ट सेडान, डिझायर, १९,०७२ युनिट्सच्या विक्रीसह चौथ्या स्थानावर राहिली. त्याने त्याच कंपनीच्या हॅचबॅक मॉडेल स्विफ्टला मागे टाकले, ज्याच्या १८,७६७ युनिट्सची विक्री नोंदवली गेली.
ब्रेझाच्या १८,७०४ युनिट्सच्या विक्रीसह मारुतीची दमदार कामगिरी सुरूच राहिली, जी कॉम्पॅक्ट एसयूव्हीसाठी असलेल्या सातत्यपूर्ण मागणीचे प्रतीक आहे. एर्टिगाने १६,५८६ युनिट्सच्या विक्रीसह उपयोगिता आणि CNG पर्यायामुळे देशातील सर्वांत लोकप्रिय MPV म्हणून त्याने आपले आघाडीचे स्थान कायम ठेवले.
भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्यांमध्ये टाटाची आणखी एक एसयूव्ही होती, ज्यात पंचच्या १५,९८० युनिट्सची नोंद झाली. ही मायक्रो-एसयूव्ही मजबूत; पण आकाराने लहान, लहान पॅकेज शोधणाऱ्या पहिल्यांदाच गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक पसंतीची गाडी राहिली आहे. महिंद्राची आयकॉनिक स्कॉर्पिओ १५,८८५ युनिट्ससह लगेचच मागे होती. स्कॉर्पिओ-N आणि स्कॉर्पिओ क्लासिकच्या वाढलेल्या मागणीमुळे तिची विक्री मजबूत राहिली.
या यादीत सर्वांत शेवटी मारुती सुझुकी वॅगनआर आहे, जिचे १४,५७५ युनिट्स विकले गेले आहेत, जे बजेट-फ्रेंडली खरेदीदारांमध्ये तिची कायम असलेली लोकप्रियता सिद्ध करते. आश्चर्यकारक बाब म्हणजे सहसा दर महिन्याच्या टॉप-१० विक्री यादीत असणाऱ्या ह्युंदाई मोटर इंडियाचा डिसेंबर २०२५ मध्ये एकही मॉडेल बेस्ट-सेलर यादीत नव्हता. मिड-साइज SUV सेग्मेंटमध्ये दीर्घकाळ वर्चस्व गाजवणारी ह्युंदाई क्रेटाही या यादीत दिसली नाही. ही दुर्मीळ अनुपस्थिती बाजार किती वेगाने बदलत आहे हे दाखवते आणि वेळेवर अपडेट्स नसतील, तर स्थापित व लोकप्रिय गाड्यांनाही स्पर्धेचा दबाव सहन करावा लागू शकतो, हे अधोरेखित करते.

डिसेंबर २०२५ मधील १० सर्वाधिक विकल्या गेलेल्या गाड्या…
- मारुती सुझुकी बलेनो – २२,१०८ युनिट्स
- मारुती सुझुकी फ्रॉन्क्स – २०,७०६ युनिट्स
- टाटा नेक्सन – १९,३७५ युनिट्स
- मारुती सुझुकी डिझायर – १९,०७२ युनिट्स
- मारुती सुझुकी स्विफ्ट – १८,७६७ युनिट्स
- मारुती सुझुकी ब्रेझा – १८,७०४ युनिट्स
- मारुती सुझुकी अर्टिगा – १६,५८६ युनिट्स
- टाटा पंच – १५,९८० युनिट्स
- महिंद्रा स्कॉर्पिओ – १५,८८५ युनिट्स
- मारुती सुझुकी वॅगनआर – १४,५७५ युनिट्स.
डिसेंबर २०२५ मधील आकडे स्पष्टपणे दाखवतात की, मारुती सुझुकी अजूनही बाजारात चांगली कामगिरी करते आहे. तर, टाटा आणि महिंद्रा महत्त्वाच्या एसयूव्ही सेग्मेंटमध्ये आपली उपस्थिती अधिक मजबूत करीत आहेत. हा सकारात्मक वेग भारतीय ऑटोमोबाईल उद्योगासाठी पुढील वर्ष अधिक स्पर्धात्मक आणि गतिमान ठरणार असल्याचे संकेत देतो.
