गेल्या आठवड्यात हिमाचल प्रदेश सरकारने कोविड -१९वरील निर्बंध कमी केल्यामुळे पर्यटक शिमला येथे दाखल होत आहेत. रविवारी सोलन जिल्ह्यातील परवानू सीमेवर वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. पोलिसांनी इतर राज्यातून आलेल्या प्रवाशांच्या ई-पासची तपासणी करण्यासाठी वाहने थांबवली होती. कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्याने सरकारने आरटी-पीसीआर चाचणीनंतर हिमाचल प्रदेशात पर्यटकांना येण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर पर्यटकांमध्ये अचानक वाढ झाली आहे. तरीही, अद्याप प्रवासासाठी राज्यात कोविड ई-पास आवश्यक आहे. Reposted from @ndtv As soon as Himachal Pradesh announced that COVID-19 RT-PCR negative tests are no longer required to enter the state, hundreds of cars were seen on the road leading up to the state#Himachal #HimachalPradesh #Traffic #TrafficJam #RTPCRTest #Covid19 pic.twitter.com/QP9k7QASKx — Monowar Hussain (@Monowartlp) June 13, 2021 पर्यटकांमुळे झालेल्या ट्रॅफिकचा व्हिडिओ व्हायरल होताच ट्विटरवर प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी ‘पर्यटकांबद्दल चिंता’ व संताप व्यक्त केला, तर इतरांनी याबाबत मीम्स शेअर करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. #HimachalPradesh geared to welcome all travelers! - RT-PCR test not required - No restrictions#TravelKiSecondInnings #TourPlanners #TheTourPlanners #itnikhushi #partner #govinda #SalmanKhan #MEMES #memechat #memesdaily pic.twitter.com/KKaQmCXF29 — The Tour Planners (@thetourplanners) June 13, 2021 *Himachal Pradesh opens after new guidelines* Himachal lovers around India: pic.twitter.com/AK9vSHvII8 — SARCASM (@ssaarrccaassm) June 14, 2021 *Himachal Pradesh eases Covid restrictions* Delhites : pic.twitter.com/PSlTrbSElk — Kyakahein (@KehHiDeteHai) June 13, 2021 Hotel owners be like pic.twitter.com/UVaD2sBY0w — Nikhil Rampal (@NikhilRampal1) June 14, 2021 Waah kya systematic traffic hai — रोहित डवरे (@rohitdaware) June 13, 2021 . Like Govt like citizens :) 2nd wave was not enough for them to learn their lessons.. — Tanmay V.S (@tanmay_shinde99) June 13, 2021 Third wave of cars! — Amit (@Neemeater) June 13, 2021 राज्यात संध्याकाळी ०५.०० ते पहाटे ०५.०० पर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे, तर कलम १४४ रद्द करण्यात आला आहे. ५० टक्के क्षमतेसह सार्वजनिक वाहतुकीला परवानगी आहे. १४ जूनपासून सकाळी ९.०० ते संध्याकाळी ६.०० या वेळेत दुकाने सुरु असतील. राज्यात १३ जूनला ३७० हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार ५,४०२ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात एकूण मृत्यूची संख्या ३,३६८ आहे.