scorecardresearch

लडाखच्या पॅंगॉंग लेकमध्ये दारूच्या नशेत चालवली SUV, VIRAL VIDEO पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ४५०० मीटर उंचीवर असलेल्या हिमालय पर्वतावर स्थित पॅंगॉंग लेकला दूषित करताना दिसून आले. हा व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांची तळपायाची आग मस्तकात जात आहे.

pangong-lake-video
(Photo: Twitter/ Jigmat Ladakhi )

कुठे फिरायला जायचा विचार केला तर सगळ्याच आधी लडाखचा विचार सर्वात आधी येतो. लडाख सर्वांत जास्त उंचीवर असलेलं हे ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही. थंडगार हवामान, बर्फाच्छादित पर्वत, सुंदर तलाव आणि शांत वातावरण यामुळे अत्यंत रमणीय असलेलं लडाख नेहमीच पर्यटकांना भुरळ घालतं. पण त्या स्थळांचे महत्त्व न समजत काही लोक तेथे अस्वच्छता करून तेथील शोभा कमी करीत असतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ४५०० मीटर उंचीवर असलेल्या हिमालय पर्वतावर स्थित पॅंगॉंग लेकला दूषित करताना दिसून आले. हा व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांची तळपायाची आग मस्तकात जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सुंदर दिसणाऱ्या पॅंगॉंग लेकमध्ये काही तरूण SUV चालवताना दिसून येत आहेत. SUV मध्ये बसलेल्या काही तरूणांपैकी दोन तरूण सनरूफमधून बाहेर पडलेले दिसून येत आहेत. इतकंच नव्हे तर तलावाच्या काठावरही त्यांनी चक्क दारूच्या बाटल्या देखील ठेवल्या होत्या. हा व्हिडीओ पाहून असं वाटतंय जणू हे तरूण सुंदर अशा पॅंगॉंग लेकमध्ये SUV चालवण्याचा आनंद घेताना दिसून येत आहेत. हा व्हिडीओ त्यांनी शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर बघता बघता व्हायरल देखील झाला. या घटनेचा व्हिडीओ पाहताच लोकांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

Jigmat Ladakhi नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, ‘मी पुन्हा एकदा आणखी एक लाजिरवाणा व्हिडीओ शेअर करत आहे. असे बेजबाबदार पर्यटक लडाखचे नुकसान करत आहेत. तुम्हाला माहीत आहे का? लडाखमध्ये पक्ष्यांच्या 350 हून अधिक प्रजाती आहेत आणि पॅंगॉंगसारख्या तलावांमध्ये अनेक पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. अशा कृतीमुळे अनेक पक्षी प्रजातींच्या अधिवासाला धोका निर्माण होऊ शकतो.”

आणखी वाचा : मुलीची मदत करण्यासाठी खुर्चीवरून उठला, अन् नको ते घडलं, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : या माकडाने मिल्खा सिंगलाही मागे टाकलंय, धावण्याची स्टाईल पाहून तुम्हीही फॅन व्हाल

हॉलो तलाव आणि पँगॉंग त्सो म्हणूनही या तलावाला ओळखले जाते. हा तलाव आशियातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याच्या तलावांपैकी एक आहे. हा तलाव १०० किमी परिसरात पसरलेला आहे. त्यातील दोन तृतीयांश भाग तिबेटमध्ये आहे, तर एक तृतीयांश पूर्व लडाखमध्ये आहे. हा तलाव अतिशय सुंदर आहे. हा व्हिडीओ ट्विटरवर पाहिल्यावर लोक संतापले. अनेक युजर्सनी एचआर, डीएल, पीबी, सीएच म्हणजेच हरियाणा, दिल्ली, पंजाब आणि चंदीगड येथून येणाऱ्या गाड्यांवर असे कृत्य करताना पाहिले आहे. लोकांनी या कारचा नंबरही शेअर केला आणि असे कृत्य केल्यानंतर त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, असे सांगितले.

इथे पाहा प्रतिक्रिया :

जिग्मतने नंतर ट्विट केले की त्याला हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरून मिळाला आहे. मात्र हे लोक दारू पिऊन तलावाच्या काठावर कसे गेले आणि तलावाचे प्रदूषण कसे करू लागले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अशी वृत्ती खपवून घेतली जाऊ शकत नाही, असेही त्यांनी लिहिले आहे. या लोकांना त्यांच्या कृत्याची लाज वाटली पाहिजे, असे युजर्सनी कमेंट करत लिहिले. या व्हिडीओवर लोक संतापले आहेत. ही कार कुठली आहे हे देखील लोकांनी शोधून काढले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tourist drive car in pangong lake video will make you angry prp