इंटरनेटच्या युगात सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ आपण विसरून जातो; तर काही व्हिडीओ कायमचे लक्षात राहतात. काही व्हिडीओ असे असतात; जे पाहिल्यानंतर लोकांची चांगलीच दमछाक होते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही थरकाप भरेल आणि हे कसं झालं, याचा तुम्ही विचार करीत राहाल.

सध्या असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ म्हणजे कोणत्या तरी समुद्रातील एका दुर्घटनेचा आहे. समुद्राच्या जोरदार लाटांचा आनंद अनेकांना घ्यायचा असतो. पाणी हे जीवन आहे हे तर आपल्याला माहीतच आहे; पण कधी कधी त्यामुळे विनाशही ओढवू शकतो. ते लक्षात घेऊन समुद्रकिनारी आणि समुद्रात जाताना काळजी घ्यायला हवी. बोटीतून प्रवास करताना तर नेहमीच यासंबंधी सावधगिरीचा इशारा दिला जातो. सध्या अशा स्वरूपाची एक दुर्घटना दाखवून देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. काही पर्यटक लाटांचा आनंद घेत होते, मात्र, काहीच क्षणांत त्यांच्या आनंदावर विरजण पडलं.

aloja Central Jail, Taloja Central Jail Implements AI Powered Surveillance, CCTV Cameras in Taloja central jail, Security and Transparency, Taloja news, panvel news,
तळोजा कारागृहातील कैद्यांच्या हालचालींवर तिसर्‍या डोळ्याची नजर
police, pune, drunk drivers,
पुणे : मद्यपींकडून पोलिसांच्या तिजोरीत कोट्यवधींची भर, दीड महिन्यात १६८४ जणांवर कारवाई; १२ कोटींचा दंड वसूल
akkadevi dam chirner marathi news
उरण: चिरनेरच्या आक्कादेवी बंधाऱ्यावर पर्यटकांची गर्दी, वर्षा पर्यटनसाठी निसर्गरम्य स्थळांवर पर्यटकांची पावले
Ranthambore national park marathi news
रणथंबोरच्या “रिद्धी” वाघीण आणि बछड्यांची कमाल पहिलीत का !
Shani Rahu Nakshatra Gochar
शनी राहूच्या जोडीमुळे २०२५ पर्यंत तब्बल ८ राशी होणार अपार श्रीमंत; बघता बघता बदलेल आयुष्य, कुंडलीत कसे येतील अच्छे दिन?
Jackfruit, Health, Health Special,
Health Special: फणसाच्या बियांमध्ये दडलंय काय?
junabai tigress, Sachin Tendulkar,
VIDEO : पाचवेळा मातृत्त्व, १७ पेक्षा अधिक बछड्यांची आई; क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही आहे चाहता जिचा, अशी ती…
Mouse Jiggler Sacks People Job
एका ‘माउस जिगलर’ने हजारो लोकांच्या नोकऱ्या घालवल्या! आहे तरी काय हा प्रकार, कर्मचाऱ्यांची हुशारी कशी उलट फिरली?

या व्हायरल व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की, काही पर्यटक समुद्रात फिरायला गेले होते. खवळलेल्या या समुद्रात मोठ्या लाटा उसळत होत्या. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, काही पर्यटक समुद्राच्या लाटांचा आनंद घेण्यासाठी बोटीत बसलेत खरे; मात्र काही सेकंदांनंतर त्यांना समुद्राच्या धोकादायक लाटांचा सामना करावा लागला. मात्र, यादरम्यान प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात अचानक उलटली. लाटा इतक्या धोकादायक होत्या की, बोट उलटून त्याचे दोन तुकडे झाले. हा धोकादायक व्हिडीओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. या बोटीत सुमारे १५ ते २० पर्यटक असून, एक माणूस त्यावर नियंत्रण ठेवताना दिसतोय. बोट बुडाल्यानंतर हे सर्व जण समुद्रात पोहताना दिसले. यात कोणती जिवितहानी झाली की नाही, याबद्दल माहिती मिळू शकली नाही.

(हे ही वाचा: महिलांनो, आता भाजी बनविण्याची झंझट संपली! बाजारात आली स्वयंपाक बनविणारी मशीन, Video पाहून तुम्हीही व्हाल आनंदी)

व्हायरल व्हिडीओ येथे पाहा

हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर laughtercolours नावाच्या युजरने शेअर केला आहे. ही बातमी लिहेपर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असेल. हे धोकादायक दृश्य पाहिल्यानंतर लोक घाबरले आणि बोटीवरील लोकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करू लागले. कमेंट करताना एका युजरने लिहिले, “आशा आहे की, ते सर्व जिवंत आणि सुरक्षित असतील.”