Shocking video: जंगल सफारी हा खूप थ्रीलिंग अनुभव असतो. या जंगल सफारीदरम्यान वेगवेगळे प्राणी पाहायला मिळतात. पण, जंगलात फिरायला जाताना काही गोष्टी लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे असते. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे जंगलात फिरताना वन्यप्राण्यांना त्रास न देणे, दुसरी गोष्ट म्हणजे जंगल सफारीदरम्यान पार्क प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे. मात्र, काही पर्यटक सर्व नियम धाब्यावर बसवीत जंगल सफारी करताना दिसतात. अशाच प्रकारे काही पर्यटक जंगल सफारीसाठी गेले होते. यावेळी एका पर्यटकाला सिंहाच्या नादाला लागणं चांगलंच महागात पडलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो पाहून युजर्सनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सिंह पिंजऱ्यात बंदिस्त असला किंवा बाहेर असला तरी सिंह हा सिंहच असतो हे कधीही विसरू नये. जंगलातील प्राण्यांमध्ये सिंह हा सर्वात धोकादायक आहे आणि त्याच्या सामर्थ्यापुढे सर्वात मोठा प्राणीही टिकू शकत नाही. मात्र, काही जण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात माणसाने सिंहाची खोड काढली, कदाचित तो जंगलाचा राजा कोण आहे हे विसरला असावा.मग काय, सिंहाने त्याला असा डोस दिला की तो आयुष्यभर विसरणार नाही.
पर्यटकांनी चक्क सिंहाचे केस ओढले
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. जंगल सफारीवर निघालेले पर्यटक गाडीमध्ये बसून एका सिंहाची छेड काढत आहेत. हा सिंह पर्यटकांच्या गाडीशेजारी बसला आहे. लक्षवेधी बाब म्हणजे हा सिंह अगदी हाताच्या अंतरावर बसलाय. तेवढ्यात एक व्यक्ती गुपचूप सिंहाची छेड काढतो. तो सिंहाच्या केसाला हात लावून त्याचं लक्ष आपल्या दिशेनं वळवण्याचा प्रयत्न करतो. पण ही बाब सिंहाला फारशी आवडत नाही. त्यामुळे त्रासिक नजरेनं तो या पर्यटकाकडे पाहतो. अन् तो एक लूकच त्या पर्यटकाला शांत करण्यासाठी पुरेसा ठरतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> धक्कादायक! यूट्युबवर व्हिडीओ पाहून ५ मुलं बनवत होती बॉम्ब, स्फोट झाला अन्…VIDEO पाहून अंगावर येईल काटा
हजारो लोकांनी या व्हिडिओला लाईक करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणत आहे की, त्या व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ लगेच मिळाले. अनेक लोकांच्या यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्यात.लोकांनी या व्हिडिओवर कमेंट करून सिंहाच्या टेक्निकचं कौतुक केलं आहे. त्याची ताकद आणि निर्भयता त्याला जंगलाचा राजा बनवते, असंही काही जण म्हणाले.
© IE Online Media Services (P) Ltd