जर तुम्ही जंगल सफारीसाठी गेला आहात आणि अचानक तुमच्या गाडीवर वाघाने हल्ला केला तर तुम्ही काय कराल? वाघाच्या भीतीने नक्कीच तुमचा थरकाप उडेल. असाच काहीसा प्रकार जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांच्या एका ग्रुपसोबत घडला आहे. या पर्यटकांना वाघाला जवळून पाहायचे होते जेव्हा ते वाघाच्या जवळ गेले, यानंतर जे काही घडले ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये जंगल सफारी साठी गेलक्या पर्यटकांची जीप दिसत आहे. जे वाघाला अगदी जवळून पाहण्याच्या इच्छेने बसले होते. त्याने झाडाझुडपांच्या मागे लपलेला वाघ पाहिला होता. यानंतर त्याचे फोटो क्लिक करण्यात ते व्यस्त झाले. पण पुढच्याच क्षणी असं काही घडलं की लोकं पार घाबरून गेली. वाघ अचानक रागाने त्यांच्यावर हल्ला करायला आला. त्यानंतर उघड्या जीपमध्ये बसलेले लोक घाबरून ओरडू लागले. सुदैवाने वाघाने त्यांच्यावर हल्ला केला नाही, अन्यथा काहीही होऊ शकले असते.

( हे ही वाचा: Video: रेल्वे कर्मचाऱ्याची हात चलाखी…; तिकीट काऊंटरवरील ‘हा’ व्हिडिओ व्हायरल का होतोय एकदा पाहाच)

वाघाने अचानक पर्यटकांच्या दिशेने झेप घेतल्याचा व्हिडिओ

( हे ही वाचा: Video: नग्नावस्थेत तब्बल २५०० लोकं पोहोचली एकाच ठिकाणी…कारण ऐकाल तर..)

हा व्हिडिओ IFS अधिकारी सुरेंद्र मेहरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कधीकधी वाघांना जवळून पाहण्याची आपली उत्सुकता त्यांच्या नैसर्गिक अधिवासात घुसखोरीशिवाय काही नसते. अवघ्या काही सेकंदांची ही क्लिप आतापर्यंत १६ हजारांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, जंगल सफारी करताना नेहमी सतर्क राहावे. त्याचवेळी दुसरा वापरकर्ता म्हणतो, सफारी या प्रकारावर बंदी घातली पाहिजे. दुसरा वापरकर्ता म्हणतो, खूप भाग्यवान होते जे वाचले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourists stop jeap near a tiger see what happened next watch viral video gps
First published on: 29-11-2022 at 12:45 IST