Ranthambore Tiger Viral Video: राजस्थानातील रणथंभोर राष्ट्रीय उद्यानात घडलेला एक थरारक प्रसंग सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. नेहमीप्रमाणे सकाळची सफारी सुरू असताना अचानक दगडी अवशेषांच्या मागून उगवलेल्या भल्या मोठ्या वाघाने पर्यटकांच्या अगदी काही फुटांवर येत ‘राजेशाही हजेरी’ लावली. क्षणभर सगळ्यांचे हृदय जोरजोराने धडधडू लागले… कुणाला श्वास घेण्याचीही भीती वाटत होती.

प्राचीन रणथंभोर किल्ल्याच्या शेजारील जुन्या दगडी भिंतीवरून वाघाने अगदी चालतच प्रवेश केला. शांत, समाधानी आणि स्वतःच्या जंगलातील अधिपती असल्याचा अभिमान पावलापावलांतून दिसत होता. भिंतीवर विसावत तो सरळ जीपकडे पाहत राहिला. त्या नजरेत अशी ताकद होती की जीपमधील प्रत्येकजण अक्षरशः थिजून गेला.

थराराचा क्षण – वाघ तोंड उघडून जांभई देत बसला!

ज्याने हा क्षण कॅमेऱ्यात कैद केला, त्याने लिहिलं, “फक्त काही फुटांवर इतका सुंदर जीव… अविश्वसनीय!” पण, खरी मजा पुढे होती. वाघाने अचानक मोठी जांभई दिली… जणू काही म्हणत होता, “तुमचं येणं माझ्या दुपारच्या विश्रांतीत व्यत्यय आणतंय!”
त्या शांततेतली जांभईही एवढी भव्य आणि थरारक वाटली की पर्यटकांनी आपोआपच श्वास रोखून धरला.

एक पर्यटक तर म्हणतो, “मी भीतीपोटी फोन ढालीसारखा धरला आणि त्या भीषण क्षणाचं सुंदर चित्रण केलं!”

सोशल मीडियावर धुमाकूळ – ‘शेरखान’ची एन्ट्री जणू चित्रपटातली!

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट होताच हजारो प्रतिक्रिया मिळाल्या. एका युजरने लिहिले, “तो भिंतीवरून चालत आला तेव्हा डोक्यात ‘जंगल बुक’मधल्या शेअरखानची म्युझिकच वाजू लागली!” दुसरा म्हणतो, “वाघ झोपला की जगातल्या कोणत्याही जीवापेक्षा देखणा दिसतो.”

तर एक अनुभवी वनप्रेमी म्हणाला, “ही सर्कस नाही. अशा जोरजोरात ओरडण्याने वाघांचं वर्तन बिघडतं. जंगल त्याचं घर, आपण फक्त पाहुणे!”

“वरून पाहतोय तो… मी असतो तर पळालो असतो!”

काही युजर्सनी मजेत लिहिलं, “वाघाने उंचावरून नजर टाकली… मी तर थेट धावत पळालो असतो!”

तर आणखी एक जण म्हणाला, “हा क्षण म्हणजे आशीर्वाद! राजा स्वतः येऊन पोझ देतो? खरंच नशीबवान आहोत!”

रणथंभोरमध्ये आनंदाची बातमी- वाघिणीला तीन गोंडस पिल्लं

या थरारक प्रसंगानंतर काही दिवसांनीच रणथंभोर वनक्षेत्रातून सुखद वृत्त मिळाले. चार वर्षांची वाघीण T-२३०७ हिने तीन गोंडस पिल्लांना जन्म दिला आहे. ही वाघीण T-१२१ आणि T-१११ यांची कन्या असून ती सामान्यतः कुंदेरा रेंजमध्ये वावरते. वन विभागाने सांगितले की हे पिल्लू एका वर्षापर्यंत ‘अर्भक’ मानले जाते आणि त्यानंतर ‘अर्धवयीन.’ सध्या रणथंभोरमध्ये तब्बल १९ लहान वाघ-छावे आहेत आणि त्यांच्या सुरक्षेसाठी वनदल कसून लक्ष ठेवून आहे.

शेवटी… रणथंभोरचा राजा पुन्हा चर्चेत!

या थरारक भेटीनं एक गोष्ट पुन्हा स्पष्ट केली- जंगलात राजा एकच… शेरखान!
आणि त्याच्या ‘जांभईतही’ असा थरार दडलेला आहे की ज्यामुळे कोणत्याही पर्यटकाला आयुष्यभर लक्षात राहील असाच अनुभव मिळतो.

येथे पाहा व्हिडीओ