ट्रेंडिंग माणिक मागे हिते गाण्यावर पारंपारिक बिहू नृत्य बघितला का? व्हिडीओ होतोय व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पिवळ्या रंगाची साडी परिधान करत एका महिलेने मणिके मागे हिथेवर सुंदर बिहू नृत्य सादर केले आहे.

viral dance video
व्हायरल डान्स व्हिडीओ (फोटो: _pakhiroy_/Instagram)

माणिक मागे हिते या प्रसिद्ध आणि ट्रेंडीग गाण्यावर पारंपारिक बिहू डान्स करतानाचा एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाखी रॉय या कॉटेंट क्रियेटरने गेल्या महिन्यात इन्स्टाग्रामवर योहानी यांनी गायलेल्या व्हायरल गायनावर नृत्य करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये पिवळी साडी परिधान करून आसाम राज्यातील एक देशी लोकनृत्य असलेले बिहू सादर करताना दिसू शकते. व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत जवळ जवळ १० हजार व्ह्यूज मिळाले आहेत.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

आता व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, मणिके मागे हिथेवर बिहू नृत्य सादर करताना सुंदर हास्य त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. हा व्हिडीओ टेरेसवर शूट करण्यात आला आहे.योहानी गायलेले हे गाणं मे मध्ये रिलीज झाल्यानंतर गाणं तुफान व्हायरल झाले.नेटिझन्सनी या व्हिडिओला मोठा थम्स अप दिला. व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत जवळ जवळ १० हजार व्ह्यूज मिळाले आहेत. कमेंट्स सेक्शन “उत्कृष्ट”, “सुंदर” आणि “छान” सारख्या शब्दांनी परिपूर्ण झाला आहे.

( हे ही वाचा: ‘Squid Game’ मध्ये पाकिस्तानी व्यक्तीच्या भूमिकेत दिसलेला ‘हा’ भारतीय अभिनेता आहे तरी कोण? )

( हे ही वाचा:जाणून घ्या; ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये कोणते नवीन शब्द जोडले गेले? )

गाण्यावर बनवलेत अनेक व्हिडीओ

अलिकडेच, बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आणि इन्स्टाग्राम वापरकर्ते त्यांचे मणिके मागे हिथेवर नृत्य करणारे व्हिडीओ अपलोड करत आहेत. सोशल मीडियावर जवळजवळ प्रत्येक इतर व्हिडीओमध्ये हे गाणे पार्श्वभूमीवर वाजत आहे. काही दिवसांपूर्वी, इंडिगोच्या एका रिकाम्या फ्लाइटवर एका एअर होस्टेसने मणिके मॅगे हिथेवर नाचलेल्या व्हिडीओने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले. आयत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एअर होस्टेसने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. काही दिवसांतच या व्हिडीओला ६० दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Traditional bihu dance to the trending song manik mage hite the video went viral ttg