Train Accident Viral Video : ट्रेनच्या दरवाजावर लटकून प्रवास करणे धोक्याचे असते, अशा सूचना देऊनही लोक काही सुधारण्याचे नाव घेत नाहीत. फोटो, व्हिडीओ आणि रील्सच्या नादात अनेकदा ते इतके वेडे होतात की स्वत:चा जीव ते धोक्यात घालतायत याचाही विचार करत नाहीत. सोशल मीडियावरही ट्रेनमधील अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, जे पाहिल्यानंतर घाबरून जायला होते. पण, काही दिवसांनी सर्व विसरून लोक त्याच ट्रेनमधील प्रवासात त्याच चुका पुन्हा करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी धावत्या ट्रेनच्या गेटवर उभी राहून व्हिडीओ शूट करच असते. यावेळी अचानक ती विजेच्या खांबाला धडकते आणि त्यानंतर जे काही घडते ते फारच भयंकर आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.
व्हिडीओ पाहिल्यानंतर उडेल थरकाप
व्हिडीओमध्ये एक तरुणी रील बनवण्याच्या नादात कशी भीषण अपघाताची बळी ठरते हे दिसतेय. या व्हिडीओचा शेवट इतका भयानक आहे की पाहतानाही भीती वाटते. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी ट्रेनमधून प्रवास करत आहे. यावेळी ती ट्रेनच्या दरवाजाजवळ जाऊन उभी राहते. नंतर धावत्या ट्रेनच्या दरवाजाला लटकून व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. यानंतर क्षणात असे काही घडते, जे पाहून कोणालाही धडकी भरेल.
व्हिडीओ शूट करत असताना तरुणी डोकं मागे करते, अशाने डोकं जोरात जाऊन खांबावर आदळते. रील बनवण्याच्या प्रयत्नात ती आपला जीव धोक्यात घालत होती. नशीब चांगले म्हणून ती या अपघातानंतर ट्रेनमधून खाली पडली नाही, तर ती दरवाजातच लटकत राहिली. पण, खांबावर जोरात डोकं आदळल्याने ती घाबरली, पण तिने हात सोडले नाहीत, शेवटी काही लोकांनी मिळून तिला ट्रेनच्या आत घेतले.
हेही वाचा – मुलं मोबाईलला हात लावताना १०० वेळा विचार करतील; वापरा फक्त शिक्षकांनी Video मध्ये दाखवलेली ‘ही’ ट्रिक
पाहा ट्रेन अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ
हा व्हिडीओ @Horror_clip नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर अनेकांनी तरुणीला चांगलीच अद्दल घडली असेल, तसेच यात तिचीच चूक असल्याचे म्हणत तरुणीच्या वागण्यावर संताप व्यक्त केला आहे; तर काहींनी तरुणीच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. पण कोणीही अशाप्रकारे आपला जीव धोक्यात घालून रिल बनवणे चुकीचे आहे.