Viral Video : देशात रेल्वेला उशीर होणं ही एक सामान्य गोष्ट समजली जाते. उशिराने धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवासी वाट बघून कंटाळतात. रेल्वेची वाट बघत प्लॅटफॉर्मवर तासनतास बसणारे प्रवासी तुम्ही नक्कीच पाहिले असतील. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ट्रेन प्लॅटफॉर्मवर ९ तास उशीराने पोहोचल्यानंतर प्रवाशांचा आनंद पाहण्यासारखा होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ट्रेन आल्याने लोकं प्लॅटफॉर्मवरच नाचताना दिसत आहेत.

प्लॅटफॉर्मवरच नाचू लागले प्रवासी

हा व्हायरल व्हिडिओ ट्विटरवर हार्दिक बोंथू नावाच्या युजरने शेअर केला आहे. यासोबत त्याने लिहिले की, आमची ट्रेन तब्बल ९ तास उशीराने आली. ट्रेनचे आगमन होताच लोकांनी आनंद व्यक्त केला. ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताच लोकांनी जल्लोष सुरू केला. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता की, हा प्लॅटफॉर्म प्रवाशांनी संपूर्ण भरल्याचे दिसत आहे. प्रवासी ट्रेनची वाट बघत असतानाच ट्रेनचा हॉर्न वाजतो आणि ट्रेन फलाटावर येते. ट्रेन आल्याचे पाहून तेथे उपस्थित असलेले अनेक प्रवासी नाचू लागतात आणि आनंद व्यक्त करतात.

Mumbai, BEST, Mumbai BEST buses,
मुंबई : प्रवाशांना थांब्यांवर थांबा, बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बेस्ट बससाठी तासन्तास प्रतीक्षा
navi mumbai nmmt bus marathi news, nmmt digital boards marathi news
नवी मुंबई: बस थांब्यांवरील डिजिटल फलक बंद, एनएमएमटी बस प्रवाशांची मोठी गैरसोय
Mumbai Metro Introduces Wristband Ticketing for Metro 1 Route No Need for Paper or Mobile Tickets
‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी आता मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकिट सेवा कार्यान्वित
Technical Glitch Disrupts varsova andheri ghatkopar Mumbai Metro 1
ऐन गर्दीच्या वेळेस ‘मेट्रो १’ विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे सेवा १० ते १५ मिनिट विलंबाने; स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी

( हे ही वाचा: Video: पर्यटकांना वाघाला जवळून पाहण्याचा मोह नडला! वाघ अचानक उड्या मारत आला अन…)

येथे व्हिडीओ पाहा

( हे ही वाचा: Video: भर जत्रेत बॉयफ्रेंडसाठी ५ मुलींनी एकीला बेदम मारले; भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला देखील पडल्या लाथा-बुक्या)

ट्रेन आल्याचे समजताच प्लॅटफॉर्मवर उभे असलेले अनेक प्रवासी खुश होत जल्लोष करताना दिसत आहेत. प्लॅटफॉर्मजवळ ट्रेन थांबताच लोक टाळ्या वाजवत नाचू लागतात. यासोबत तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती ट्रेनच्या समोर वाकून तिचे आभार मानत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रया देत आहेत. त्यातल्या काहीजणांनी ही ट्रेन नेमकी कुठली असा प्रश्न केला आहे.