scorecardresearch

‘या’ बोगद्यात ट्रेन लाईटशिवाय जाते, पाहा रोमांचक प्रवासाचा VIRAL VIDEO

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बोगद्यात प्रवेश करताना ट्रेनची लाईट बंद होते.

‘या’ बोगद्यात ट्रेन लाईटशिवाय जाते, पाहा रोमांचक प्रवासाचा VIRAL VIDEO
(Photo: Twitter/ grescoe)

जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करता तेव्हा तुमच्या आजूबाजूचे सौंदर्य पाहून तुम्ही निसर्गाचा आनंद घेत असता. काही दृश्ये प्रवाशांच्या डोळ्यांसमोरून जातात जी आपल्याला थक्क करून सोडतात. एक अशाच ठिकाणच्या प्रवासाचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बोगद्यात प्रवेश करताना ट्रेनची लाईट बंद होते. दिवे न लावता बोगद्यात शिरणाऱ्या या ट्रेनचा आश्चर्यकारक प्रवास लोकांना वेड लावणारा आहे. बाहेरच्या प्रकाशात ट्रेनच्या दोन्ही बाजूला झाडांचा आकार दिसतो. त्यावर रंगीबेरंगी प्रकाश त्याच्या सौंदर्यात आणखी भर घालतो.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ जपानमधला आहे. जपानमधील क्योटो जवळ कुरामा लाईनवर असलेल्या इझान इलेक्ट्रिक रेल्वे ट्रेनच्या आतून मॅपल टनेलमध्ये शूट केलेला हा व्हिडीओ आहे. हे नैसर्गिक सौंदर्य कोणत्याही प्रवासात लोकांना भुरळ घालते. नैसर्गिक दृष्यांव्यतिरिक्त कधीकधी कृत्रिम सौंदर्य देखील दिसून येतं, ज्यावर फक्त एकटक पाहण्याची इच्छा होते. असाच एक अप्रतिम पर्यटन दौरा जपानमधील मॅपल टनेलमधलं हे सौंदर्य केवळ पाहातच राहावं, असं वाटतं.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : याला म्हणतात खरं प्रेम! पतीला मागे बसवून आजीने मोपेड चालवली

मेपल टॅनलचा हा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंगळवारी Taras Grescoe-@grescoe नावाच्या युजरने ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला. ट्रेनच्या आतून रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये ट्रेन बोगद्यात जाण्यापूर्वी ड्रायव्हर दिवे बंद करत असल्याचे दिसून येतो. व्हिडीओच्या काही सेकंदांनंतर मॅपलच्या झाडांचे आकर्षक रंग दिसतात. व्हिडीओ फ्रेममध्ये ट्रेनच्या आतील भागातून भव्य मॅपल झाडांचे दृश्य आणि ट्रेनच्या बाहेरील बोगद्याचे सौंदर्य हे आकर्षित करणारे आहे. हा व्हिडिओ मूळतः नोव्हेंबर २०२१ मध्ये मिनाटो फुमिटुकी नावाच्या यूजरने ट्विटरवर पोस्ट केला होता. मात्र, आता तब्बल १० महिन्यांनंतर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ग्राहकाला पार्सल देण्यासाठी ट्रेनच्या मागे धावला डन्झो एजंट…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : वळण घेत असताना अचानक ट्रकचे दोन तुकडे झाले, चाक रस्त्यावर पळू लागले

व्हिडीओला जवळपास ९ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. ३५,००० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले. या आश्चर्यकारक व्हिडीओ ट्विटरवर ६,००० हून अधिक ट्विटर यूजर्सनी री-ट्विट देखील केले आहे. मॅपल टनेलच्या सौंदर्याने भारावून गेलेल्या ट्विटर युजर्सनी मजेदार कमेंट्सही केल्या. एका यूजर्सनी लिहिले की, “किती अद्भुत! सौंदर्य आणि निसर्गाचे खूप कौतुक! पर्यावरणाच्या जवळ असणे ही एक सुखद भावना आहे.” दुसऱ्या युजरने कमेंट केली, “तुम्ही ट्रेनमध्ये चढा आणि पुस्तक वाचायला सुरुवात करा. काही वेळ जातो आणि तुम्हाला दिवे बंद झालेले दिसतात. जेव्हा तुम्ही पुस्तकातून डोळे काढता तेव्हा मॅपलचा गोड नारिंगी आणि पिवळा रंग एक सुंदर दृश्य आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या