Train Viral Video : भारतीय रेल्वेतील अनेक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात रेल्वे गार्ड एका अपंग व्यक्तीबरोबर गैरवर्तन करताना दिसत आहे. अपंग प्रवाशाला ट्रेनमधून खाली उतरवण्यासाठी तो त्याचा टी-शर्ट पकडतो आणि त्यानंतर शिवीगाळ करीत त्याला प्रवाशांसमोर अतिशय अपमानास्पद वागणूक देतो. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

बिहारच्या समस्तीपूर रेल्वेस्थानकावर ही धक्कादायक घटना घडली आहे. हा व्हिडीओ दिल्ली-सहरसादरम्यान धावणाऱ्या वैशाली एक्स्प्रेसमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.

Belgian woman raped 5 days in Pakistan islamabad
Pakistan: पाकिस्तानमध्ये बेल्जियम पर्यटक महिलेवर पाच दिवस लैंगिक अत्याचार; हात-पाय बांधलेल्या अवस्थेत रस्त्यावर…
10th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१० सप्टेंबर पंचांग: अनुराधा नक्षत्रात सुखाने भरेल तुमची झोळी! प्रिय व्यक्तीची भेट तर व्यापारात होईल मोठा फायदा; वाचा तुमचे भविष्य
Kalachauki mahaganpati video
गणपती आगमन बघायला जाताय? काळाचौकीच्या महागणपती आगमनाला काय झालं पाहा; VIDEO पाहूनच धडकी भरेल
woman standing outside 16th floor window to clean
साफसफाईची जीवघेणी हौस! कांजूरमार्गमधील इमारतीतील धडकी भरवणारे दृश्य; Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
mumbai viral video eat breakfast at your own risk in Mumbai
मुंबईत तुमच्या रिस्कवर नाश्ता करा; Video तील ‘हे’ किळसवाणे दृश्य पाहून तुम्ही इडली, मेदूवडा खाणं द्याल सोडून
Female doctor Assaulted By Drunk patient
Mumbai Crime : मुंबईत महिला डॉक्टरला मारहाण, रक्ताने माखलेले कापसाचे बोळे फेकले आणि..; मद्यधुंद अवस्थेत रुग्णाचा राडा
Desi Jugaad Video pushing a closed vehicle
बंद कार ढकलण्याची ही कोणती पद्धत? Viral Video पाहून युजर्स चकित; म्हणाले, “जुगाड टॅलेंट…”

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक अपंग व्यक्ती ट्रेनमध्ये चढली असून, रेल्वे गार्ड त्याच्यावर रागावलेला दिसत आहे. रेल्वे गार्ड संतापून प्रवाशाचा टी-शर्ट पकडून त्याच्याशी गैरवर्तन करीत आहे. एवढेच नाही, तर त्याने यावेळी अपशब्दही वापरले. त्यानंतर गार्डने आरपीएफला फोन केला आणि सांगितले की, ती व्यक्ती त्याच्या अपंगत्वामुळे मोठी नवाब बनत आहे. त्याला ट्रेनमधून उतरवा.

ट्रेन गार्डचे अपंग व्यक्तीबरोबर गैरवर्तन

गार्डने कळवल्यावर आरपीएफ जवान तेथे पोहोचला आणि त्याने त्या अपंग व्यक्तीला ट्रेनमधून बाहेर काढल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा वाद का झाला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डीआरएम समस्तीपूर यांना या प्रकरणाची दखल घेण्यास सांगण्यात आले.

दिव्यांग व्यक्ती ही रोसरा येथील थाटिया गावची रहिवासी आहे आणि मुझफ्फरपूरला जाण्यासाठी समस्तीपूर रेल्वेस्थानकावर वैशाली सुपर फास्ट ट्रेनमध्ये चढली होती. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गार्डने अपंग प्रवाशासोबत गैरवर्तन केले आणि त्याला जबरदस्तीने बोगीतून खाली ढकलले. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये गार्ड अपंग प्रवाशाला शिवीगाळ करताना आणि पायाने मारताना दिसत आहे.

Read More Trending News : दिव्यांग तरुणाचा झिंगाट डान्स! मुंबईतील टाटा रुग्णालयातील ‘या’ VIDEO ने जिंकली नेटकऱ्यांची मने

या घटनेवर प्रतिक्रिया देताना डीआरएम श्रीवास्तव म्हणाले की, ही घटना अत्यंत दुःखद आहे. कोणत्याही प्रवाशाशी असे वागणे अस्वीकार्य आहे. आरोपी गार्ड हा सोनपूर रेल्वे विभागाचा असल्याची पुष्टी त्यांनी केली. त्रिसदस्यीय समितीच्या चौकशी अहवालाच्या आधारे सोनपूर रेल्वे विभागाला कारवाईची शिफारस करण्यात येणार आहे. अद्याप याबाबत तपास सुरू आहे.

या घटनेनंतर समस्तीपूरचे डीआरएम विनय श्रीवास्तव यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.