ट्रान्स मॅन साहद आणि ट्रान्स वुमन झिया पावल हे तृतीयपंथी कपल आईबाबा झाले आहेत. ट्रान्स मॅन साहदने बुधवारी (८ फेब्रुवारी) बाळाला जन्म दिला आहे. त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. झियाने सोशल मीडियावर बाळाचा फोटो शेअर करत ही गुड न्यूज दिली आहे. ट्रान्स मॅनने बाळाला जन्म दिल्याची भारतातील ही पहिलीच घटना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झियाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बाळाचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. झिया व साहदचं बाळ सुखरूप व तंदुरुस्त असल्याची माहिती झियाने पोस्टद्वारे दिली आहे. “आज(८ फेब्रुवारी) सकाळी ९.३७ मिनिटांनी आम्हाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. आमचा आनंद गगनात मावत नाहीये. आनंदाश्रूंनी डोळे भरुन आले आहेत. आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या सगळ्यांचे आभार”,असं झियाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही पाहा>> Photos: भारतात पहिल्यांदाच ट्रान्स मॅन देणार बाळाला जन्म, तृतीयपंथियांनी केलेलं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत

केरळमध्ये वास्तव्यास असलेले साहद(२३) व झिया(२१) गेल्या तीन वर्षांपासून एकत्र राहत आहेत. साहद व झियाने केलेल्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा रंगली होती. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. झियाने सोशल मीडियाद्वारे ते आईबाबा होणार असल्याची माहिती दिली होती. आता आईबाबा झाल्यानंतर त्यांच्या फोटोंवर कमेंटमध्ये शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

साहद व झिया यांनी लिंग परिवर्तनासाठी हार्मोन थेरेपी केली आहे. त्यामुळे साहदचे स्तनही काढण्यात आले आहेत. बाळाला जन्म दिल्यानंतर सहा महिन्यांनी किंवा एका वर्षानंतर सहाद ट्रान्स मॅन होण्यासाठीची ट्रिटमेंट पुन्हा सुरु करणार आहे. साहदने स्तन काढल्यामुळं बाळाला रुग्णालयातील ब्रेस्ट मिल्क बँकेतून दुधाची उपलब्धता करुन देणार असल्याचं झियाने म्हटलं होतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Transgender couple ziya and sahad blessed with baby boy first time trans man delivered baby in india kak
First published on: 08-02-2023 at 20:50 IST