उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यातून धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तृतीयपंथी व्यक्ती आणि एक ई-रिक्षाचालक भांडताना दिसत आहेत. तृतीयपंथी व्यक्तीने ई-रिक्षाचालकाचे १० रुपयांचे भाडे देण्यास नकार दिल्यानंतर हा वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. भररस्त्यात दोघे वाद घालत मारामारी करतानाचा हा व्हिडीओ दिसत आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही घटना चार ते पाच दिवसांपूर्वीची असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तृतीयपंथी व्यक्तीने ई-रिक्षाचालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी त्या व्यक्तीने त्याला ई-रिक्षातून ओढत खाली उतरवले आणि शिवीगाळ करीत थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दोघांनी एकमेकांचे टी-शर्ट पकडले आणि नंतर बुक्क्यांनी मारहाण करू लागले. यावेळी ई-रिक्षाचालकाने स्वतःच्या बचावाचा प्रयत्न करीत आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले. धक्कादायक बाब म्हणजे मारामारी सुरू असतानाच तृतीयपंथी व्यक्तीने भररस्त्यात स्वच:ची पॅन्ट काढली आणि चालकाला धमकावण्यास सुरुवात केली.

Indias most expensive film flopped after row over same sex kiss
दोन अभिनेत्रींमधील किसिंग सीनमुळे वाद, दिग्दर्शकाचं करिअर संपलं; तब्बल १० कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावलेले फक्त…
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Maharashtra Political Parties Challenges in Marathi
Maharashtra Assembly Elections 2024: राज्यातील प्रमुख पक्षांपुढील आव्हानांचा लेखाजोखा…
Kamala Harris's husband Doug Emhoff Affair
Kamala Harris’s husband Affair: कमला हॅरीस यांच्या पतीचं मुलं सांभाळणाऱ्या नॅनीशी होतं अफेअर! पहिल्या लग्नाबाबत म्हणाले…
trp list of top 15 serial
TRP च्या शर्यतीत कोणी मारली बाजी? टॉप ५ ठरल्या स्टार प्रवाहच्या ‘या’ मालिका, तर ‘झी मराठी’…; पाहा संपूर्ण यादी
Late actor Vikas Sethi wife Jhanvi shared his unseen video
अभिनेता विकास सेठीच्या निधनानंतर पत्नीची पोस्ट; ‘तो’ Unseen व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
salman khan, salman khan bracelet, salman khan video, सलमान खान, सलमान खान ब्रेसलेट, सलमान खान व्हिडीओ
सलमानच्या हातातील प्रसिद्ध ब्रेसलेट का आहे खास? वाचा काय म्हणाला भाईजान
zee marathi awards shiva fame purva phadke emotional video
Video : आज आई-बाबा असते तर…; पुरस्कार मिळताच पालकांच्या आठवणीत ‘शिवा’ला अश्रू अनावर; मुक्ता बर्वेने दिला धीर

इतकेच नाही, तर अशा विचित्र अवस्थेततही तिने चालकाला मारहाण करणे सुरूच ठेवले. यावेळी दोघांची मारामारी पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांची गर्दी जमा झाली होती. काही वेळाने यातील काही लोकांनी पुढे येत दोघांची समजूत घातली. त्यानंतर चालक आणि ती तृतीयपंथी व्यक्ती तिथून निघून गेली. दोघांकडूनही पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. पण, त्या दोघांच्यातील मारहाणीचा व्हिडीओ कोणीतरी शूट केला आणि तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चालत्या बसच्या दरवाजाजवळ उभी महिला, अचानक तोल गेला अन् कोसळली खाली, नंतर जे झालं फारच भयानक; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

सोशल मीडिया युजर्सकडूनही ती महिला तृतीयपंथी असल्याचा दावा केला जात आहे; पण तिच्या या विचित्र कृतीवर अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर अनेकांना तिचे असे वागणे पाहून धक्काच बसला आहे. या घटनेचे नेमके ठिकाण अद्याप कळलेले नाही; पण सार्वजनिक ठिकाणी हे लज्जास्पद कृत्य करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता लोक उपस्थित करीत आहेत.

Story img Loader