CCTV footage Shows Stray Dog Attacks Child: तेलंगणाच्या करीमनगरमध्ये अलीकडच्या काळात भटक्या श्वानांकडून माणसांवर हल्ला होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या परिसरातील लोक भटक्या श्वानांना घाबरू लागेल आहेत. स्थानिकांनी श्वानांच्या व त्यांच्या क्रूर वर्तनाची बाब अधिकाऱ्यांना सांगितली आहे आणि रहिवाशांच्या, विशेषतः मुलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांची मागणी केली आहे. आज पुन्हा एकदा तेलंगणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये दोन चिमुकले खेळत असताना श्वानाने एकावर हल्ला केला आहे,

व्हायरल व्हिडीओ तेलंगणाचा आहे. तेलंगणामध्ये बुधवारी करीमनगर येथे रस्त्यावर खेळणाऱ्या एका चिमुकल्यावर अचानक भटक्या कुत्र्याने हल्ला केला. हरीनंदन असे या मुलाचे नाव असून, तो केवळ १८ महिन्यांचा होता. चिमुकला त्याच्या मित्राबरोबर खेळत होता. तेव्हा समोरून एक भटका श्वान दोघांच्या जवळ येतो. तितक्यात हरीनंदनबरोबर असणारा दुसरा चिमुकला श्वानाला पाहून पळ काढतो. पण, हरीनंदन वेळेत पळून जाण्यात अयशस्वी ठरला. नक्की काय घडले ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

cop risks his life to catch criminal Wanted In 75 Cases police jumps on scooter to catch criminal which dragged him for 20 meters in Bengaluru
पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ७५ गुन्हे असलेल्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी स्वत:च्या जीवाची लावली बाजी; VIDEO पाहाच
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
A two month old baby elephant guarding its mother
VIRAL VIDEO : हत्तीने केली पर्यटकांची गंमत; तुरुतुरु धावत आला पुढे अन्… आईचे संरक्षण करणाऱ्या दोन महिन्यांच्या पिल्लाला पाहाच
UP Govt Teacher Demands Kiss
Video: हजेरी लावण्यासाठी महिला शिक्षिकेकडे शिक्षकाची संतापजनक मागणी; म्हणाला, “आधी गालावर..”
sunita williams and barry wilmore
Sunita Williams : अंतराळ स्थानकात अडकलेल्या सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? NASA चं धक्कादायक उत्तर
Bangladesh Violence Viral Video Muzlim women Tied Hindu women to poles Fact check
Bangladesh Violence : बांगलादेशात हिंदू महिलांवर अत्याचार; खांबाला बांधून शिवीगाळ? नेमकं सत्य काय, वाचाच…
Khaleda Zia vs Sheikh Hasina
Khaleda Zia: शेख हसीनांना आश्रय दिल्यामुळे खलेदा झियांच्या पक्षाचा भारताला इशारा; “तर कठीण होईल…”
Abhishek Bachchan reacts on divorce rumors with Aishwarya Rai
ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन; म्हणाला…

हेही वाचा…Banana Leaf : केळीच्या पानांच्या प्लेट्स कशा बनवल्या जातात माहिती आहे का? VIDEO तून पाहा झलक; नेटकरी म्हणाले, ‘प्लास्टिकच्या…’

व्हिडीओ नक्की बघा…

कुटुंबीयांनी घेतली मुलाला वाचवण्यासाठी धाव :

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, हरीनंदन वेळेत पळून जाण्यात अयशस्वी ठरल्यावर श्वानाने त्याच्यावर उडी मारली आणि त्याला जमिनीवर पाडले. चिमुकला जोरजोरात ओरडू लागला. आवाज ऐकताच कुटुंबीयांनी मुलाला वाचवण्यासाठी धाव घेतली आणि श्वानपासून चिमुकल्याची सुटका केली. पण, श्वानाच्या हल्ल्यानंतर चिमुकला गंभीर जखमी झाला आहे आणि हरिनंदनला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.

तेलंगणातील करीमनगर येथील सातवाहन विद्यापीठाजवळ ७ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे फुटेजमध्ये दिसून आले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @TeluguScribe या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. डेक्कन क्रॉनिकलच्या एका अहवालात, असे कळले की, करीमनगर महानगरपालिका त्यांच्या परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला तोंड देण्यासाठी प्राण्यांच्या क्रूरता प्रतिबंधक कायदा, 1960 चे पालन करून प्राणी जन्म नियंत्रण (एबीसी) नियम लागू करणार आहे.