फिर हेरा फेरी मधील अक्षय कुमारचा ‘साइड वाला स्वॅग’ स्टाइल करतीये ट्रेंड; मिम्स व्हायरल

चित्रपट रिलीज झाल्यापासून १५ वर्षांनंतर, नेटिझन्स राजूच्या साइड वाला स्वॅगसाठी त्यांचे प्रेम दर्शवण्यासाठी एक मजेदार ट्रेंडसह परत आले आहेत.

Side Wala Swag
साइड वाला स्वॅग ट्रेंड (फोटो: Instagram )

आतापर्यंत तुम्ही “ये बाबुराव का स्टाईल है रे!” यावर आधारित असंख्य मीम्स पाहिले असतील. आणि बाबुराव गणपतराव आपटे यांच्या व्यक्तिरेखेचे ​​परेश रावल यांनी साकारलेले प्रतिष्ठित चित्रण पाहून जरा जास्तच हसायला येतं. पण जर तुम्ही प्रियदर्शन दिग्दर्शित ‘फिर हेरा फेरी’ हा कॉमेडी चित्रपट पाहिला असेल, तर तुम्हाला हे माहित असेलच की संपूर्ण चित्रपटात फक्त बाबूराव या पत्राने खूप पंचलाईन दिल्या. पण याच सोबत अक्षय कुमारने साकारलेल्या राजूच्या पात्राला विसरून चालणार नाही.

साइड वाला स्वॅग ट्रेंड काय आहे?

प्रचंड महत्त्वाकांक्षा असलेला एक साधा माणूस म्हणजे राजू जो पैशाच्या बाबतीत नेहमीच अडचणीत सापडताना चित्रपटात दिसला. एका दृश्यात, राजू हटके कपडे घालून बंगल्यासमोर उभा राहतो. अक्षयच्या आनंदी साइड वाला स्वॅगने नेटिझन्सना अनेक मीम्स तयार करण्यास प्रवृत्त केले. आणि आता, चित्रपट रिलीज झाल्यापासून १५ वर्षांनंतर, नेटिझन्स राजूच्या साइड वाला स्वॅगसाठी त्यांचे प्रेम दर्शवण्यासाठी एक मजेदार ट्रेंडसह परत आले आहेत.

( हे ही वाचा: पाककडून हारल्यानंतर तुम्ही TV फोडला का? विचारणाऱ्याला आकाश चोप्राचं भन्नाट उत्तर, “मित्रा, आमच्याकडे…” )

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया कशी होती?

राजू का फॅन ट्रेंडने इंस्टाग्रामवर कब्जा केला आहे आणि अगदी कतरिना आणि इसाबेल कैफ सारख्या सेलिब्रिटींनी त्यात भाग घेतला आहे. नमन जैन नावाच्या या इंस्टाग्राम वापरकर्त्याने ८ जुलै रोजी हा ट्रेंड सुरू केला आणि नेटिझन्सना तो खूप आवडला.

( हे ही वाचा: सिंहासोबत व्हिडीओ काढण्यासाठी त्याने बसची खिडकी उघडली अन्…)

राजू का फॅन चॅलेंज

ट्रेंडला पारंपारिक टच

माही की अक्षय? कोणी चांगले केलं?

टेकड्यांवरही स्वॅग

फिर हेरा फेरी २००६ मध्ये रिलीज झाला आणि त्यात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल यांच्यासह बिपाशा बसू, रिमी, जॉनी लीव्हर आणि राजपाल यादव यांनी भूमिका साकारल्या होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Trend goes viral of styling akshay kumars side wala swag of hera pheri memes instagram ttg

ताज्या बातम्या