जगभरात झपाट्याने वाढणारी लोकसंख्या सर्वांसाठी डोकेदुखी बनली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे मानवी वस्तीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे तर त्या तुलनेत वनक्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे जंगलात राहणारे प्राणी अनेकवेळा रस्त्यावर किंवा मानवी वस्तीमध्ये येत असतात. शिवाय देशात झपाट्याने होत असलेल्या विकासकामांमुळे अनेक नवनवीन रस्ते जंगलाच्या जवळून करण्यात येत आहेत.

अशी अनेक जंगले आहेत ज्या जंगलामधून किंवा जंगलाच्या शेजारुन रस्ते गेले आहेत. त्यामुळे जंगलात राहणाऱ्या वन्य प्राण्यांचा अनेकदा आपणाला सामना करावा लागतो. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका संतप्त हत्तीने जंगलातून जाणाऱ्या एका टेम्पोवर हल्ला केल्याचं दिसत आहे.

a man dancing with a box of fireworks on his head
धक्कादायक! हातात पेटवलेल्या फटाक्यांची पेटी धरून डान्स करत होता, पुढे असे काही घडले.. VIDEO व्हायरल
Furious gaur tosses man in the air after he provokes
“आ बैल मुझे मार!” चिडलेल्या रानगव्याने व्यक्तीला तीन वेळा उचलून आपटले, थरारक Video Viral
young woman saved a caged dog in a burning building shocking video goes viral on social media
जीवाची पर्वा न करता तरुणीने वाचवला पेटत्या इमारतीमध्ये फसलेल्या कुत्र्याचा जीव, VIDEO पाहून येईल अंगावर काटा
Dog Shot By Police Officer Over 30 Times
धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्याने कुत्र्यावर झाडल्या ३० पेक्षा जास्त गोळ्या, तरीही वाचला त्याचा जीव; काय आहे प्रकरण?

हेही पाहा- Video: भारतीयांसारखा देशी जुगाड करायला गेली अन् विदेशी महिला तोंडावर पडली; नेटकरी म्हणाले “फक्त भारतातील…”

हत्तीने केला टेम्पोवर हल्ला –

व्हायरल होत असलेला व्हिडिओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्य @rupin1992 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक रस्त्यावर उभे असणारे वाहन हत्ती संतापतो आणि त्या वाहनासमोर येतो आणि मग हत्ती रागवतो. एखादं खेळणं फेकावं त्या पद्धतीने तो एक मोठा पिकअप टेम्पो उचलून फेकताना दिसत आहे.

हत्तीचा राग पाहून थक्क झाले नेटकरी –

हेही पाहा- Video: …अन् वरातीत नाचणाऱ्या तरुणांचा तो सेल्फी शेवटचा ठरला, स्कॉर्पिओच्या धडकेत एकाचा मृत्यू तर ३० जण जखमी

व्हिडिओमध्ये हत्तीने दिलेल्या धडकेमुळे पिकअप टेम्पो रस्त्याच्या कडेला जाऊन उलटल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘तुम्ही माझ्या परिसरात घर का बांधले.’ आतापर्यंत हा व्हिडिओ एक लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर अनेकांनी त्याला लाईक केलं आहे. व्हिडिओ पाहून अनेकजण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. तर अनेकांनी हत्तीने जंगलात अतिक्रमण करणाऱ्या लोकांना चांगला धडा शिकवला असल्याचं म्हटलं आहे.