scorecardresearch

तरुणाने अनोख्या पद्धतीने केला टॉयलेटमधील हँड ड्रायरचा वापर; IPS अधिकाऱ्याने शेअर केलेला Video पाहाच

व्हिडीओमध्ये, एक तरुण टॉयलेटमधील हँड ड्रायरच्या खाली बसल्याचं दिसत आहे

public bathroom news
सोशल मीडियावर जुगाडू लोकांचे अनेक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. (Photo : Twiter)

सोशल मीडियावर अनेक जुगाडू लोकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. ते कधी कोणत्या गोष्टीचा कुठे वापर करतील आणि काय शोध लावतील याचा अंदाज लावणं कठिण असतं. सध्या अशाच एका जुगाडू तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हला हसू आवरणं कठिण होणार आहे.

तुम्ही जर कधी मोठ्या मॉलमध्ये किंवा सिनेमागृहात गेला असाल तर तेथील वॉशरूममध्ये तुम्ही हँड ड्रायरने तुमचे हात सुकवले असतील. पण एका तरुणाने या हँड ड्रायरचा वापर कशासाठी केला आहे ते पाहून तुम्ही थक्क व्हाल. कारण या व्हिडीओतील एक तरुण हँड ड्रायरने चक्क आपले केस सेट करताना दिसत आहे. त्याच्या या कृतीचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून अनेकजण पोट धरुण हसत आहेत.

हेही पाहा- दोन तोंड, तीन पायांचा ‘हा’ कसला विचित्र प्राणी? व्हायरल Video पाहून नेटकरी झाले थक्क

या व्हायरल व्हिडीओमध्ये, वॉशरूममध्ये एक तरुण हँड ड्रायरच्या खाली बसल्याचं दिसत आहे. शिवाय तो कंगव्याच्या साहाय्याने आपले केस सेट करत आहे. हँड ड्रायरचा वापर हेअर ड्रायर म्हणून केल्यामुळे अनेकजण त्याचा हा जुगाड पाहून नेटकरी इम्प्रेस झाले आहेत. शिवाय काहींनी गरजेला माणूस कशाचाही वापर करु शकतो असं म्हटलं आहे.

हेही पाहा- …आणि तो ठरला मित्रांचा अखेरचा संवाद! सहाव्या मजल्यावरून कोसळला तरुण, Video पाहून उडेल थरकाप

या अप्रतिम जुगाडचा व्हिडिओ IPS अधिकारी आरिफ शेख यांनी त्यांच्या @arifhs1 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी ‘गरज ही शोधाची जननी आहे.’ असं लिहिलं आहे. आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे तर तो अनेकांनी लाईक केला आहे. तर या व्हिडीओवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे की, आम्ही भारतीय जुगाड शोधण्यात आणि वापरण्यात सर्वात पुढे आहोत. तर आणखी एकाने लिहिले की, ‘हा मुलगा अद्भुत असून तो माणूस ‘जुगाडपूर’चा राजा आहे.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 12:17 IST
ताज्या बातम्या