Premium

“रेल्वेखाली घुसून फोटोग्राफी…” रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा ‘तो’ फोटो Viral; माजी IAS अधिकाऱ्याची सडकून टीका, म्हणाले…

अपघातानंतर रेल्वेच्या ‘कवच’ यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करत अनेकांनी रेल्वेमंत्र्याना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

Odisha train accident Latest news
ओडिशात रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. (Photo : Twitter)

ओडिशात रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनजवळ तीन रेल्वेत झालेल्या विचित्र अपघातात २३८ जणांचा मृत्यू तर, ९०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताचे अनेक फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या रेल्वे अपघातानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेशी संबंधित माहिती जाणून घेतली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवाय रेल्वेमंत्र्यांनी या अपघाताची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती, त्यानुसार चौकशीला सुरुवात देखील झाली आहे. मात्र, या अपघातानंतर रेल्वेच्या ‘कवच’ यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करत अनेकांनी रेल्वेमंत्र्याना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. यासाठी ट्रोलर्स रेल्वे मंत्र्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. तर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली आहे.

माजी आयएएस अधिकाऱ्यांनी केली टीका-

हेही पाहा- “मी ट्रेनमधील पंख्याला पकडून…”, रेल्वे अपघातातून बचावलेल्या प्रवाशाचा थरारक अनुभव; म्हणाला, “सीटखाली दोन वर्षांचा मुलगा…”

अशातच माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी देखील रेल्वे मंत्र्यांवर टीका केली आहे. यासाठी त्यांनी एक ट्विट केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे, “ट्रेनखाली घुसून फोटोग्राफी करत आहात, रेल्वे मंत्री जी साहेबानी हा रोग सर्वांना लावला आहे, नैतिकतेपोटी राजीनामा कसा द्याल? इथे बलात्काराचे आरोप असलेले खासदार, थारने चिरडून मारल्याचा आरोप असलेले मंत्रीही राजीनामा देत नाहीत.” दुसर्‍या ट्विटमध्ये सूर्य प्रताप सिंह यांनी लिहिलं आहे, “एकेकाळी रेल्वे मंत्री जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत असत. असं आज कोणी करेल का? शिवाय बिचार्‍या रेल्वेमंत्र्यांना दोन डब्यांच्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्याची संधीही मिळत नाही, ते नावालाच आहेत.”

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

IPS अधिकाऱ्यांनी केलेल्या ट्विटवर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. @DrVermaAshutosh नावाच्या युजरने लिहिलं, “बालासोर ट्रेन दुर्घटनेत आतापर्यंत २८० लोक गाडले गेले आहेत. बुलेट ट्रेनचे स्वप्न विकणाऱ्या मोदी सरकारचे हे सर्वात मोठे अपयश आहे. अजून एकही राजीनामा मिळाला आला नाही का?” तर आणखी एका यूजरने लिहिले, “पूर्वी साधा मालगाडीचा डबा रुळावरून घसरला तरी मीडिया माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया आणि राहुल यांचे राजीनामा आणि उत्तरे मागायचा. आज ते अपघाताचा बचाव करत आहेत.” तर काही लोकांनी अपघात हे अपघात असतात, यावरुन कोणा एका व्यक्तीला दोष देणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2023 at 16:42 IST
Next Story
Optical Illusion: तुम्हाला आधी कावळा दिसला की माणसाचा चेहरा? तुमचं उत्तर, तुमच्या स्वभावाविषयी काय सांगतं?