grandfather strict routine changed for his granddaughter : नातवंडं म्हणजे आजी-आजोबांसाठी दुधावरची साय असतात. स्वतःच्या मुलांना हक्काने मारतील, ओरडतील. पण, हीच गोष्ट नावंडांच्या बाबतीत करायला जाताना ते १० वेळा विचार करतील. त्यांनी घरात बनवलेले अनेक नियम नातवंडांच्या हट्टापायी अगदी हसत-खेळत मोडतील आणि हे पाहून घरातील सगळी मंडळी शॉक होऊन जातील. तर, आज नात आणि आजोबांची अशीच एक गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते आहे.
ही गोष्ट अहमदाबादचे रहिवासी प्रीतेश लखानी यांनी एक्स (ट्विटर) वर शेअर केली. त्यात त्यांनी आपल्या वडिलांची शिस्त आणि नात झाल्यावर ती कशी बदलून गेली याबद्दल सांगितले आहे. प्रीतेश लखानी यांचे वडील अनेक वर्षांपासून सकाळी बरोबर ८ वाजून ४५ मिनिटांनी ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडायचे. त्यांच्या आजूबाजूला काय चालले आहे, जेवणाचा डबा तयार आहे की नाही, याची त्यांना कधीच पर्वा नसायची. वर्षानुवर्षे कुटुंबातील प्रत्येकासाठी हीच दिनचर्या राहिली होती. त्यांच्या मुलांनी या गोष्टी अगदी शांतपणे स्वीकारून जुळवून घेतल्या होत्या.
आजोबा-नातीचा ‘हा’ सुंदर क्षण पाहून तुम्हीही जाल भारावून (Viral Post)
सकाळची सर्व कामे त्यांच्या निश्चित निघण्याच्या वेळेनुसारच व्हायची. त्यात कधी बदल होईल अशी अपेक्षा कोणालाही नव्हती. पण आता जोपर्यंत त्याची नात सकाळी उठत नाही तोपर्यंत आजोबा घराबाहेर पडत नाहीत. सकाळची सुरुवात आता वेगळ्या पद्धतीने होते. असे याबाबतच्या माहितीचे वर्णन करीत त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये आजोबा फॉर्मल कपड्यांमध्ये व्यवस्थित तयार होऊन नातीबरोबर फिरायला गेल्याचे दिसत आहेत. अनेक वर्षे त्यांच्यापैकी कोणासाठीही आजोबांची दिनचर्या बदललेली नाही; पण कुटुंबातील सर्वांत नवीन सदस्यासाठी ती झटक्यात बदलली.
पोस्ट नक्की बघा…
सोशल मीडियावर ही पोस्ट @@priteshlakhani या एक्स (ट्विटर)वर अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच नेटकरी ही गोष्ट वाचून “जो माणूस आपल्या नातीसोबत फिरायला जाताना फॉर्मल कपडे, मनगटी घड्याळ व फॉर्मल शूज घालतो, तो एक अत्यंत शिस्तप्रिय व्यक्ती आहे, अशी व्यक्ती कुटुंबात असणे हे निश्चितच एक वरदान आहे”, “माझे वडीलही असेच करतात. बहुतेक त्यांना असे वाटत असावे की, त्यांना मुलांना पुन्हा एकदा सांभाळण्याची, प्रेम देण्याची दुसरी संधी मिळाली आहे. म्हणून त्यांच्यात कृतज्ञतेची भावना असते”, “साधं फिरायला जातानाही त्यांनी किती व्यवस्थित कपडे घातले आहेत”, “जेव्हा मुलांच्या आयुष्यात नातवंडं येतात, तेव्हा आपले पालक त्यांच्यात छोटे छोटे बदल करतात ही आपल्यासाठी सर्वांत चांगली गोष्ट आहे” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
