कोरोना काळापासून घरातून काम करण्याची म्हणजेच ‘वर्क फ्रॉम होम’ची पद्धत उदयास आली. त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग संपला असला तरीही अनेक कर्मचारी ऑफिसला जाण्याऐवजी ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीनेच काम करणं पसंद करतात. मात्र, घरुन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबर अनेक मजेशीर किस्से घडत असतात. या संबंधित अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेक लोक घरातून ऑनलाईन मिटींगमध्ये सहभागी होतात, यावेळी कोणी हाफ पँट घालून तर कोणी घरातील काम करत मिटींगमध्ये सहभागी झाल्याचे अनेक फोटो, व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत.

सध्या अशीच एक घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका कर्मचाऱ्याने ऑनलाइन मिटींगदरम्यान चुकीची स्क्रीन दाखवल्यामुळे तो चांगलाच अडचणीत सापडला आहे. शिवाय त्याने दाखवलेल्या चुकीच्या स्क्रिनमुळे त्याची अनेकजण चेष्टा करत आहेत. व्हायरल होत असलेल्या घटनेतील कर्मचारी Google मिटींग करत असताना त्याने लॅपटॉपवर आधी उघडलेल्या एका टॅबवर गेला, ज्याचा स्क्रीनशॉट आता व्हायरल होत आहे.

Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
Hardik Malinga Pushing Video Viral
MI vs SRH : हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाला ढकलल्याने चाहते संतापले, VIDEO होतोय व्हायरल

हेही पाहा- काय सांगता! चक्क तिसऱ्या दिवशी मूल रांगायला लागलं; आईपण आश्चर्यचकित, पाहा व्हायरल Video

खरं तर या घटनेतील व्यक्ती लॅपटॉपवर स्वत:साठी अंडरवेअर शोधत होता. याचवेळी त्याची ऑनलाईन मिटींग सुरू झाली. मिटींग सुरु असताना त्याने चुकून आधीचा टॅब उघडला, ज्यामध्ये तो अंडरवेअर सर्च करत होता. त्याने उघडलेला टॅब मिटींमधील सर्व कर्मचाऱ्यांनी पाहिला, त्यामुळे तो खूप लाजला. दरम्यान, त्या कर्मचाऱ्याने उघडलेल्या टॅबचा स्क्रीनशॉट इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. जो पाहिल्यानंतर अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण होत आहे.

हेही पाहा- थेट सहाव्या मजल्यावरून कारवर पडली ८ किलोची मांजर, घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेची संपुर्ण माहिती अमन नावाच्या ट्विटर अकाऊंवरुन दिली आहे. अमनने आपल्या ऑनलाइन मिटींगदरम्यानचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे. गुगल मिटींगदरम्यान, त्याने चुकून एका ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटची स्क्रीन दाखवली, जी तो मीटिंगच्या आधी स्क्रोल करत होता. अमनची चूक त्याच्या सहकाऱ्यांनी पकडली आणि त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. तर या घटनेनंतर एका सहकाऱ्याने त्याला सावध करण्यासाठी मिटींग सुरु असताना मेसेज केला ज्यामध्ये लिहिलं, “अमन, तू चुकीचा टॅब दाखवत आहेस, कृपया टॅब बंद कर.” तर अनेकांनी त्याच्या ट्विटवर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एकाने त्याच्या अकाऊंटला ब्लू टिक द्या असं म्हटलं आहे. तर काहींनी “भावा हे काय केलंस” असं लिहिलं आहे.