scorecardresearch

नाद केला पण वाया नाही गेला! दाढीला लटकवल्या ७१० ख्रिसमस बेल्स, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेला Video पाहाच

दाढीला लटकवलेल्या ख्रिसमस बेल्सवर लोकांचा विश्वास बसावा म्हणून या संपुर्ण घटनेचा व्हिडीओदेखील केला आहे

नाद केला पण वाया नाही गेला! दाढीला लटकवल्या ७१० ख्रिसमस बेल्स, वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेला Video पाहाच
पठ्ठ्याने दाढीमध्ये तब्बल ७१० ख्रिसमस बेल्स लावून एक नवा इतिहास रचला. (Photo : Instagram)

ख्रिसमस अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे या सणाची धामधून सर्वत्र जोरदार सुरु आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये ख्रिसमस ट्रीचे देखावे तयार करण्यात आले आहेत. तर अनेकजण आपापल्या पद्धतीने ख्रिसमससाठी सजावट करताना दिसतं आहेत. त्यामुळे ख्रिसमस वाईब सर्वत्र सुरु झाल्याचं आपणाला पाहायला मिळत आहे. शिवाय सध्याच्या सोशल मीडिया ट्रेंडमुळे आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळी आणि भन्नाट सजावट करावी असं प्रत्येकाला वाटतं असते. अशातच आता एका व्यक्तीने ख्रिसमससाठी असं काही केलं आहे की ज्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

हेही पाहा- Video: कंडोम कॅफे पाहिलात का? जेवण होताच गिफ्टमध्येही दिला जातो मोफत कंडोम, पाहा झलक

अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीने दाढीच्या मदतीने विश्वविक्रम केला आहे. जॉस स्ट्रैसर नावाच्या व्यक्तीने त्याच्या दाढीमध्ये तब्बल ७१० ख्रिसमस बेल्स लावून एक नवा इतिहास रचला आहे. सोशल मीडियावर ही घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर अनेकांना या व्यक्तीने दाढीमध्ये ७१० ख्रिसमस बेल्स लावल्या आहेत यावर आमचा विश्वासतं बसत नसल्याचंही नेटकरी म्हणत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जॉस स्ट्रैसर नावाच्या व्यक्तीने दाढीमध्ये तब्बल ७१० ख्रिसमस बेल्स लावण्याचा अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यासाठी त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. जॉसने सुट्ट्यांच्या काळात दाढीमध्ये बेल्स लावण्याचा पराक्रम केला आहे. शिवाय त्याने लोकांना विश्वास बसावा म्हणून या सर्व घटनेचं व्हिडीओ शूटींह देखील केलं आहे. त्या व्हिडीओमध्ये तो दाढीला बेल लावताना दिसतं असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, या व्यक्तीचा व्हिडिओ guinnessworldrecords अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. शिवाय जॉस स्ट्रैसरने आपल्या दाढीमध्ये सर्वाधिक बेल लावल्या आहेत. असं कॅप्शन हा व्हिडीओ शेअर करताना लिहलं आहे. महत्वाचं म्हणजे जॉस स्ट्रैसर आपल्या दाढीला रंगीबेरंगी बेल्स लाताना तो स्वत: खूप खूश झाल्याचंही पाहायला मिळत आहे. त्याच्या या अनोख्या ख्रिसमस सेलेब्रेशनचं खूप कौतुक सध्या सोशल मीडीयावर केलं जातं आहे. शिवाय दाढीला ७१० ख्रिसमस बेल्स लावल्या विश्वविक्रम झाला पण त्याला किती वेदना झाल्या हे आम्हा दाढी असणाऱ्यांना माहिती आहे. अशा मजेशीर कमेंट नेटकरी करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 11:40 IST

संबंधित बातम्या