सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ लोकांना हसवणारे असतात तर काही व्हिडीओ अंगावर शहारे आणणारे असतात. तर काही व्हिडीओ मुक्या प्राण्यांमधील वेगवेगळे गुण दाखवणारे असतात. आतापर्यंत आपण वानराला उड्या मारताना, लोकांवर हल्ला करताना पाहिलं असेल. अनेकदा तर वानरांनी मारामारी केल्याचे व्हिडीओही आपण पाहिले आहेत. मात्र, सध्या एका वानराचा अनोखा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही या वानराचे कौतुक कराल यात शंका नाही.

अनेकदा जंगली प्राणी माणसांसारखे वागतात किंवा माणसांसारखी कामे करताना दिसतात. सोशल मीडियावर अशा प्राण्यांचे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एका वानराचा असाच व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. कारण या व्हिडीओमध्ये एक वानर आपल्या मालकिणीला घरातील कामात खूप मन लावून मदत करत असल्याचं दिसत आहे. हे दृश्य पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.

mysterious human like shiny objects floating viral video
एलियन की UFO, हे नक्की काय आहे? आकाशात चमकणारी ‘ही’ गोष्ट नेमकी कोणती? Video पाहून व्हाल चकित
digit robot collapse after working 20 hours
२० तास काम करून Robot देखील थकून जमिनीवर कोसळला! ‘या’ व्हायरल व्हिडीओची होत आहे चर्चा…
newly wedded wife calls her husband aho viral video
बायकोची ‘ती’ हाक ऐकताच लाजली ‘अहों’ची स्वारी! सासरची मंडळीही खुदकन हसली; पाहा Video
funny Puneri patya video
“फुकटच्या फुलांनी देवपूजा केल्यास..” पुणेरी पाटी चर्चेत; नेटकरी म्हणाले, “पुणेकर होण्यासाठी ..”

हेही वाचा- ऑर्डर पोहोचवण्यासाठी गेला तो परतलाच नाही, कुत्र्याच्या भीतीने Swiggy बॉयने तिसऱ्या मजल्यावरुन मारली उडी

माकड तोडतोय बीन्स –

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओत, एक वानर घरात खुर्चीवर बसून भांड्यात ठेवलेले बीन्स तोडताना दिसत आहे. वानराचे एक्सप्रेशन पाहून नेटकऱ्यांना हसू आवरणं कठीण होत आहे. शिवाय हे वानरही मन लावून या बीन्स तोडत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे माणसांपेक्षा वानर प्रामाणिकपणे काम करत आहेत. अशा कमेंटही नेटकरी देत आहेत.

हेही पाहा- दोन मांजरींचा बाईकवरील प्रवासाचा Video होतोय व्हायरल, नेटकरी म्हणतायत ‘विश्वास आणि प्रेम…’

व्हिडिओला ५ मिलियनहून अधिक व्ह्यूज –

या वानराचा भन्नाट व्हिडिओ @TansuYegen नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. शिवाय हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तो नेटकऱ्यांना चांगलाच भावल्याचं दिसतं आहे. कारण हा व्हिडीओला आतापर्यंत ५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर तो ९ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने, ‘हा वानर माणसांपेक्षा प्रामाणिक काम करतोय’ असं म्हटलं आहे. तर आणखी एका व्यक्तीने मी हे पाहणं थांबवू शकत नसल्याचं म्हटलं आहे.