आज सर्वत्र जागतिक आदिवासी दिन साजरा केला गेला. या दिवसानिमित्त अनेक व्हिडीओ, फोटो, मजकूर पोस्ट करण्यात आले. दरम्यान ट्विटरवर ‘ट्रायबल आर्मी’ या अकाउंटवरून पोस्ट केलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. हे ट्विटर अकाउंट भारतातील आदिवासींच्या पिढीजात दुर्लक्षांना आव्हान देण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. या अकाउंटवरून नेहमीच माहितीपूर्ण फोटो,व्हिडीओ आणि लेख प्रदर्शित केले जातात. आजच्या जागतिक आदिवसी दिनानिमित्त त्यांनी #WeAreIndigenous या हॅशटॅगसह खास हातात बाण घेऊन सादरीकरण करणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

नक्की काय आहे हा व्हिडीओ?

पोस्ट केल्यापासून या व्हिडीओला ४.२ हजार लोकांनी बघितला आणि अनेकांनी लाईक केला आहे. हा व्हिडीओ फक्त ४४ सेकंदाचा आहे. यामध्ये एक महिला एका मंचावर उभा आहे. त्याच्या कपड्यांवरून ती आदिवासी आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. त्याने हातात बाण घेतलेला आहे. तो व्यक्ती चक्क हातावर उलटा उभा राहताना दिसून येत आहे. यावेळी त्याने बाण पायामध्ये पकडलेला दिसून येत आहे. हळू हळू तो तसाच उलटा राहून बाण मारण्याची तयारी करताना दिसून येत आहे. पुढच्या काही क्षणात ती महिला पुढे असलेल्या टार्गेटवर अगदी अचूक पद्धतीने बार मारताना दिसत आहे. या अचूक निशाण्यानंतर उपस्थितांनी तिचं टाळ्या वाजवून कौतुक केलेलं बघायला मिळत आहे. अचूक बाण मारल्यावर ती महिला सरळ होत बाण वर करत सर्वांना अभिवादन करताना दिसत आहे.

नेटीझन्सच्या प्रतिकिया

या व्हिडीओवर असंख्य नेटीझन्सनी कमेंट केली आहे. अनेकांनी खाली जागतिक आदिवसी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी “विलक्षण प्रतिभा” अशी कमेंट केली आहे. अजून एका युजरने “आपण यांना प्रोफेशनल खेळामध्ये का प्रमोट करत नाही #ऑलम्पिक” अशी कमेंट केली तर दुसऱ्या युजरने “अनेकांना हा प्रोफेशनल खेळ आहे हे माहित नाही” अशा कमेंट केल्या आहेत.

ह्या व्हिडीओकडे बघून हा व्हिडीओ जुना असल्याचा दिसून येत आहे.