बिहारमध्ये अचानक रस्त्यावर पडला माशांचा पाऊस, विश्वास बसत नसेल तर हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

पण जर पृथ्वीवर माशांचा पाऊसच पडला तर? हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले ना. अहो, अशीच काहीशी घटना बिहारमध्ये घडली आहे. माशांचा पाऊस पाहून लोकांनी अक्षरशः बादल्या घेऊन मासे लुटण्यासाठी एकच गर्दी केली.

Fish-On-Road-Viral-Video
(Photo: Twitter/ ihari_krishan )

मासे खायला किती तरी जणांना आवडतं आणि हे मासे स्वतः पकडलेले असतील तर ती खाण्याची मजा काही औरचं. पण जर पृथ्वीवर माशांचा पाऊसच पडला तर? हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले ना. अहो, अशीच काहीशी घटना बिहारमध्ये घडली आहे. माशांचा पाऊस पाहून लोकांनी अक्षरशः बादल्या घेऊन मासे लुटण्यासाठी एकच गर्दी केली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. रस्त्यावर पडलेला माशांचा सडा पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित व्हाल.

अलीकडेच देशातील अनेक भागात मुसळधार पावसाचे व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पण नुकतंच बिहारमध्ये पडलेल्या माशांच्या पावसाने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांनी अक्षरशः डोक्याला हात लावलाय. यावेळी व्हायरल व्हिडीओमध्ये कुणी बादलीत मासे भरताना, तर कुणी हेल्मेटमध्ये मासे भरताना दिसत आहे.

आणखी वाचा : Viral Video: घरात चोरी करण्यासाठी घुसला चोर; मग पुढे काय घडलं? हे पाहून हसून-हसून दुखेल पोट

ही घटना बिहार राज्यातल्या आमस क्षेत्रातल घडली असून स्त्याने सुसाट वेगात धावणार्‍या एका ट्रकमधून मासे अक्षरश: पावसाप्रमाणे पडल्या. त्या गोळा करण्यासाठी रस्त्यावरून जाणार्‍या- येणार्‍यांनी मोठी गर्दी केली. हाताला जितके येतील तितके मासे गोळी करून घरी घेऊन जाण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. जणू जनतेला मोठी लॉटरीच लागली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अकुना गावाजवळ ट्रक चालकाने ब्रेक दाबल्याने हा सर्व प्रकार घडला. मासळीने भरलेला ट्रक गयाच्या जीटी रोडने कुठेतरी जात होताा. ट्रकचालकाने ब्रेक दाबताच ट्रक अनियंत्रित झाला आणि ट्रकमध्ये भरलेले मासे रस्त्यावर पडू लागले. कदाचित ट्रक चालकाच्या हे लक्षात आले नाही आणि तो पुढे निघून गेला. मात्र मागे पडलेल्या माशांमुळे रस्त्यावर माशांचा सडाच पडला.

आणखी वाचा : चक्क पोपटाने महिलेला ‘आई’ म्हणून हाक मारायला सुरुवात केली, दोघांमधील संभाषणाचा हा VIDEO VIRAL

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : क्या बात है! स्कायडायव्हिंग करताना उंच आकाशातून आई-वडिलांना केला व्हिडीओ कॉल

हा व्हिडीओ ‘Hari krishan’ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ लोक वारंवार पाहू लागले आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. तसंच या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा पाऊसच पडू लागला आहे. काही युजर्सनी तर या व्हिडीओवर वेगवेगळे विनोद शेअर करण्यास सुरूवात केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Truck overturned thereafter loot happened for fishes loaded on it in gaya bihar people looting fish on the road in gaya bihar prp

Next Story
“तो निर्णय वरकरणी कितीही सोपा वाटत असला तरी…”; पत्नीसाठी रोहित पवारांची भावनिक पोस्ट, कारण…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी