समुद्रात शेकडो जीव-जंतू राहतात. अनेक छोट्या माशांपासून ते धोकादायक मोठ्या माशांपर्यंत शेकडो जलचरांचं समुद्रात वास्तव्य असतं. खरंतर माणूसच त्यांच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा मोठ्या धोकादायक माशांकडून माणसांवर पाण्यात हल्ला झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. इतिहासामध्ये आजपर्यंत अनेक शार्क हल्ले झालं असून यामधी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असाच माशाच्या हल्ल्याचा एक भयानक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.  भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इजिप्तच्या बीच रिसॉर्टमध्ये पोहायला निघालेल्या रशियन पर्यटकाला टायगर शार्कने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला,  तर त्याची गर्लफ्रेंड सुखरूप बाहेर पडली. या हल्ल्यात आणखी दोन पर्यटक जखमी झाले आहेत. या संपूर्ण घटनेदरम्यान एक दुख:द बाब म्हणजे या तरुणावर हल्ला होताना या तरुणाचे वडिल हे सगळं पाहत होते, मात्र ते काहीच करु शकले नाहीत. यावेळी तरुणाच्या वडिलांसह अनेक लोक समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित होते. दरम्यान इजिप्तच्या पर्यावरण मंत्रालयाने हा ७४ किमीचा समुद्र किनारा बंद करण्यात सांगितला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – कोकणातील घरं प्रचंड पावसातही इतकी मजबूत कशी? मातीची घरे टिकतात कशी? पाहा video

या व्हिडिओमध्ये शार्क आपल्या तीक्षण दातांनी त्या व्यक्तीच्या शरीराचे लचके तोडतान दिसत असून, तो आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी पाणी त्या व्यक्तीच्या रक्ताने लाल झालेले दिसत आहे. किनाऱ्यावरील इतर पर्यटकांनी ही घटना मोबाईलमध्ये कैद केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trussian tourist dies in a shark attack in egypt live incident caught on camera video viral on social media srk
First published on: 09-06-2023 at 17:43 IST