scorecardresearch

मेकअप करून पाळीव कुत्र्यासारखं दिसण्याचा लहानगीचा प्रयत्न, निरागसतेने जिंकली नेटकऱ्यांनी मनं

अनेकांच्या घरी आपल्याला पाळीव प्राणी पाहायला मिळतात. मांजर, कुत्रा हे प्राणी तर कुटुंबाचे सदस्य असल्यासारखे घरात वावरतात. घरातील कुटुंबीय प्राण्यांवर जीवापाड प्रेम करतात.

look_like_Dog
मेकअप करून पाळीव कुत्र्यासारखं दिसण्याचा लहानगीचा प्रयत्न, निरागसतेने जिंकली नेटकऱ्यांनी मनं

अनेकांच्या घरी आपल्याला पाळीव प्राणी पाहायला मिळतात. मांजर, कुत्रा हे प्राणी तर कुटुंबाचे सदस्य असल्यासारखे घरात वावरतात. घरातील कुटुंबीय प्राण्यांवर जीवापाड प्रेम करतात. त्यांना काय हवं काय नको याची काळजी घेतात. त्यामुळे पाळी प्राण्यांसोबत भावनिक नातं तयार होतं. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आपल्याला रोज पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. यात एक लहान मुलगी तिच्या आवडत्या कुत्र्याप्रमाणे दिसण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर रंग लावताना दिसत आहे. यासाठी ती तिच्या आईच्या मेकअप किटने स्वतःला रंगवताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये तिचा कुत्रा मुलीसोबत दिसत आहे. फ्रान्सिस्को नावाच्या कुत्र्याच्या डोळ्यांचा आणि नाकाचा रंग काळा आहे. तसाच मुलगीही तिच्या डोळ्यांवर आणि नाकावर काळ्या रंगाचे वर्तुळ करून चेहरा पांढरा रंगवताना दिसते. व्हिडीओमध्ये मुलीची आई तुम्ही हा मेकअप का लावला आहे, असे म्हणताना ऐकू येते. तेव्हा ती मुलगी अतिशय निरागसपणे उत्तर देते की तिला तिच्या कुत्र्यासारखे दिसायचे आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Trying to look like a pet dog with makeup viral video rmt

ताज्या बातम्या