सोशल मीडियावर रोज कित्येक नवीन व्हिडीओ येतात आणि जातात, पण काही व्हिडीओ असे असतात जे लोकांच्या मनावर कायमची छाप सोडून जातात. अनेकदा एखादे गाणे प्रसिद्ध झाले की लोक त्यावर डान्स करत रिल्स व्हिडीओ पोस्ट करताना दिसतात. सध्या नुकतेच प्रसिद्ध झालेले “वेड लावलं” हे मराठी गाणे सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. “तुझ्या रुपानं वेड लावलं, बाई मला गं वेड लावलं…” या दोन ओळींवर लाखो लोक थिरकत असून, अनेक जण या गाण्यावर डान्स रिल्स तयार करताना दिसत आहेत. मात्र, एका चिमुकलीच्या डान्स व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Saregama Marathi चे “वेड लावलं” हे नवीन मराठी गाणे सध्या जोरदार ट्रेंडमध्ये आहे. या गाण्यात (Just Neel) आणि यशश्री राव (Yashashree Rao) यांची जोडी पाहायला मिळते. गाण्याचे आकर्षक संगीत आणि दमदार बीट्समुळे हे गाणे ऐकताच अनेकांना नाचायची इच्छा होते. त्यामुळेच हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

याच ट्रेंडिंग गाण्यावर एका चिमुकलीने केलेला भन्नाट डान्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. व्हिडीओमध्ये ही चिमुकली गाण्याची हूक स्टेप अगदी अचूकपणे करताना दिसते. तिच्या प्रत्येक डान्स स्टेपमध्ये आत्मविश्वास दिसून येतो. एवढ्या लहान वयात तिने दाखवलेले टायमिंग आणि एक्सप्रेशन पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. विशेष म्हणजे तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि निरागस स्मित नेटकऱ्यांना अक्षरशः भुरळ घालत आहे. व्हिडीओ पाहून तुमच्याही मनात येईल की, काय भारी नाचते राव ही चिमुकली. एवढ्या लहान वयात एवढं कौशल्य असणे खरंच कौतुकास्पद आहे.

हा व्हिडीओ Instagram वर shivu._9780 नावाच्या खात्यावरून पोस्ट करण्यात आला आहे. पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये “बाई मला गं वेड लावलं तुझ्या रूपाचं येड लावलं.” असे गाण्याचे बोल लिहिण्यात आले आहेत. व्हिडीओ अपलोड झाल्यानंतर अल्पावधीतच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, हजारो लोकांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत चिमुकलीच्या कौशल्याचे भरभरून कौतुक केले आहे. काहींनी “खूप सुंदर डान्स”, “लहान वयात मोठं टॅलेंट” अशा प्रतिक्रिया देत तिच्या आत्मविश्वासाची प्रशंसा केली आहे. तर काहींनी भविष्यात ही चिमुकली मोठी डान्सर होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

सध्या सोशल मीडियावर या चिमुकलीचा डान्स व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून, अनेकांना तो पुन्हा पुन्हा पाहावासा वाटत आहे. अशा प्रकारचे व्हिडीओ केवळ मनोरंजनच करत नाहीत, तर लहान मुलांमधील दडलेले कौशल्यही जगासमोर आणण्याचे काम करतात.