Analog Paneer Rishk to Heart and Intestines : महाराष्ट्रामध्ये अॅनालॉग पनीरच्या उत्पादनावर आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोणतेही हॉटेल, केटरर्स किंवा क्लाउड किचन त्याचा वापर करू शकणार नाहीत. असा आरोप आहे की, राज्यातील केवळ छोटी रेस्टॉरंट्स आणि क्लाउड किचनच नव्हे, तर मोठे ब्रँड्ससुद्धा ग्राहकांना माहिती न देता खऱ्या पनीरऐवजी अॅनालॉग पनीरचा वापर करत होते. खऱ्या पनीरपेक्षा स्वस्त असल्यामुळे त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात होता.
महाराष्ट्रात अॅनालॉग पनीरवर का घातली बंदी? (Why was analog cheese banned in Maharashtra?)
राज्य सरकारने राज्यात पनीरच्या नावाने विकल्या जाणाऱ्या अॅनालॉग किंवा नॉन-डेअरी पनीरचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एका वर्षासाठी बंदी घातली आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी गुरुवारी या संदर्भात एक आदेश जारी केला. राज्यव्यापी तपासणीत ३५.४ टक्के पनीरचे नमुने विहित मानकांचे पालन न करणारे आणि अनेक नमुन्यांमध्ये दुधाच्या फॅटऐवजी वनस्पती फॅटचा वापर केल्याचे आढळून आल्यानंतर सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
१०९ नमुने निकृष्ट दर्जाचे (109 samples of poor quality)
१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभरातून गोळा केलेल्या ३०८ नमुन्यांपैकी १०९ नमुने निकृष्ट दर्जाचे किंवा असुरक्षित असल्याचे आढळून आले. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, यापैकी ७९ नमुने निकृष्ट दर्जाचे आणि ३० नमुने पूर्णपणे असुरक्षित होते. चाचणीत असेही उघड झाले की अनेक नमुन्यांमध्ये दुधाच्या फॅटऐवजी वनस्पती फॅटचा वापर करण्यात आला होता.
अॅनालॉग पनीर म्हणजे काय? (What is analogue paneer?)
अॅनालॉग पनीर हा दुग्धजन्य पदार्थांना एक कृत्रिम पर्याय आहे, जो वनस्पती तेल आणि इतर घटक वापरून बनवला जातो. जरी ते दिसायला सामान्य पनीरसारखेच असले तरी ते दुग्धजन्य पदार्थ नाही. ते कृत्रिम घटक आणि रासायनिक पदार्थ वापरून बनवले जाते. त्यात स्टार्च किंवा पीठ, दुधाचे घन पदार्थ किंवा स्किम्ड मिल्क पावडर, प्रिझर्व्हेटिव्ह आणि कृत्रिम स्वाद मिसळलेले असतात.
सामान्य पनीर लिंबाचा रस किंवा व्हिनेगर यांसारख्या आंबट पदार्थाने दूध नासवून बनवले जाते. याउलट, अॅनालॉग पनीरवर खूप प्रक्रिया केलेली असते आणि त्यात अतिरिक्त पदार्थ असतात जे त्याला खऱ्या पनीरसारखा पोत आणि स्वरूप देतात. अॅनालॉग पनीर हा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससाठी एक स्वस्त पर्याय आहे. त्यात सामान्य पनीरपेक्षा प्रथिने कमी असतात, परंतु वनस्पती तेल आणि स्टार्चच्या मिश्रणामुळे त्यात आरोग्यासाठी हानिकारक चरबी आणि कर्बोदके जास्त प्रमाणात असतात. त्यात कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे यांसारखी आवश्यक पोषक तत्वे नसतात, जी खऱ्या पनीरमध्ये आढळतात.
ॲनालॉग चीज म्हणजे काय? (What is analog cheese?)
दुधातील फॅट्स किंवा घटक काढून टाकून त्याऐवजी वनस्पती तेल, डाल्डा किंवा इतर दुग्ध-व्यतिरिक्त उत्पादने वापरून बनवलेल्या उत्पादनाला (ॲनालॉग) किंवा ‘नॉन-डेअरी चीज’ म्हटले जाते.
अॅनालॉग पनीर आणि अॅनालॉग चीज यात साम्य अन् फरक काय? (What are the similarities and differences between analog paneer and analog cheese?)
अॅनालॉग पनीर आणि अॅनालॉग चीज ही दोन्ही दुग्ध-व्यतिरिक्त घटक आणि वनस्पती तेलांचा वापर करून बनवलेली कृत्रिम उत्पादने आहेत. संकल्पनेनुसार ही दोन्ही उत्पादने एकच असली, तरी वापराच्या प्रकारानुसार त्यांच्यात थोडा सूक्ष्म फरक आढळतो.
मुख्य साम्य(The main similarity)
बनावट पद्धत: दोन्हींमध्ये दुधातील नैसर्गिक फॅट्स काढून त्याऐवजी स्वस्त वनस्पती तेल (पाम तेल/डाल्डा), स्टार्च किंवा पीठ, स्किम्ड मिल्क पावडर आणि कृत्रिम स्वादांचा वापर केला जातो.
हेतू: नैसर्गिक दुधाचा वापर टाळून अत्यंत कमी खर्चात हुबेहूब पनीर किंवा चीजसारखा दिसणारा पर्याय तयार करणे.
सूक्ष्म फरक (Subtle differences)
अॅनालॉग पनीर: हे भारतीय पारंपरिक पनीरला पर्याय म्हणून बनवले जाते आणि मुख्यत्वे हॉटेल किंवा कॅटरिंगमध्ये भाजी, भुर्जी व टिक्का यांसारख्या पदार्थांसाठी वापरतात.
अॅनालॉग चीज: हे पाश्चात्य चीजला (उदा. मोझरेला) पर्याय म्हणून बनवले जाते. पिझ्झा, बर्गर किंवा सँडविचवर ते चीजसारखे वितळावे आणि ताणले जावे, यासाठी त्यात विशिष्ट रसायने मिसळली जातात.
अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी कसे धोकादायक आहे? (How is analog cheese dangerous to health?)
“बहुतेक रेस्टॉरंट्स जास्त खर्चामुळे शुद्ध पनीर वापरत नाहीत. स्टार्च, अॅरोरूट (arrowroot), मैदा, सॅच्युरेटेड फॅट्स, दूध पावडर व कृत्रिम दूध हे पनीरचे आकारमान वाढवण्याचे, तेज आणि चमक आणण्याचे सामान्य मार्ग आहेत. असे पनीर आतड्यांसंबंधीच्या समस्या निर्माण करू शकते,” असे मॅक्स हेल्थकेअरच्या डायटेटिक्सच्या संचालक रितिका समद्दर यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले.
अॅडिटिव्ह्ज पनीरच्या पौष्टिकतेमध्ये कसे बदल करतात? (How do additives change the nutritional profile of paneer?)
जेव्हा तुम्ही ताज्या दुधापासून पनीर बनवता तेव्हा ते प्रथिने, हेल्दी फॅट्स, कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन डी व बी१२ च्या गुणधर्मांनी समृद्ध असते. पण जर पनीर तयार करताना स्टार्च आणि इतर अॅडिटिव्ह्ज वापरले, तर कार्बोहायड्रेट व फॅट्सचे प्रमाण वाढू शकते आणि प्रथिनांचे प्रमाण कमी होते. तसेच त्यातील सूक्ष्म पोषक घटकदेखील कमी होतात. पनीरचे आकारमान थोड्या प्रमाणात वाढवणे ही वेगळी गोष्ट आहे; परंतु पनीरची रचना जास्त प्रमाणात बदलल्याने त्याचे मूळ स्वरूपच बदलते. मग त्याला अॅनालॉग पनीर (Analogue Paneer) म्हणतात.
स्टार्चयुक्त किंवा ॲनालॉग पनीरचे आरोग्यावर काय परिणाम होतात? (What’s the health impact of starchy or analogue paneer?)
अद्याप दीर्घकालीन परिणामांबद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही; परंतु अल्प काळात होणारे परिणाम म्हणजे स्टार्चयुक्त पनीरचे दररोज सेवन केल्याने पोटफुगी, बद्धकोष्ठता किंवा अतिसार यांसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. अनहेल्दी फॅट्स आणि स्टार्चयुक्त पनीरचे दररोज सेवन केल्याने कॅलरीज वाढू शकतात आणि वजन वाढू शकते. काही पदार्थ शरीराच्या हार्मोनल संतुलनात व्यत्यय आणू शकतात. दरम्यान, कृत्रिम दुधात वापरल्या जाणाऱ्या वनस्पती तेलासारख्या संतृप्त आणि ट्रान्स फॅट्समुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या रोगांचा धोका वाढतो.
भेसळयुक्त पनीर ओळखण्यासाठी चाचणी (Test to identify adulterated cheese)
आयोडीन चाचणीमध्ये भेसळयुक्त पनीरवर आयोडीन टाकल्यास पनीरवर निळसर काळा डाग पडतो. तुम्ही ते उकळण्याचा प्रयत्न केल्यास ते तेलकट थर सोडते आणि वितळते का, हे पाहू शकता. पॅकेज केलेल्या पनीरचे लेबल्सदेखील तपासा. जर पनीर शुद्ध असेल, तर ते फक्त दूध आणि सायट्रिक अॅसिड वापरून गोठवल्याची माहिती त्यावर दिलेली असेल. जर त्यात अॅडिटिव्ह, प्रिझर्व्हेटिव्ह किंवा अतिरिक्त फॅट्स असतील, तर त्यावर मिश्रित उत्पादनांची माहिती दिलेली असेल.

मूळ पनीर आणि अॅनालॉग पनीरमधील फरक कसा ओळखावा?(How to distinguish between original cheese and analog cheese?)
खरे पनीर आणि अॅनालॉग पनीरमधील फरक ओळखणे थोडे कठीण असू शकते, कारण अॅनालॉग पनीर अगदी खऱ्या पनीरप्रमाणेच दिसते. पण, ते ओळखण्याचे काही मार्ग आहेत. खऱ्या पनीरचा पोत मऊ आणि गुळगुळीत असतो. तेल आणि स्टार्चच्या उपस्थितीमुळे अॅनालॉग पनीर रबरासारखे किंवा चिकट लागू शकते. अस्सल पनीरची चव ताजी आणि दुधाळ असते, तर अॅनालॉग पनीरची चव फिकट किंवा किंचित कृत्रिम लागते. अॅनालॉग पनीर अनेकदा खऱ्या पनीरपेक्षा खूपच स्वस्त असते.
विश्वासू ठिकाणाहून आणलेल्या किंवा दुधापासून घरी बनवलेल्या पनीरचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. रस्त्यावरील दुकानांमधून आणि रेस्टॉरंटमध्येही टिक्का आणि मसालेदार सॉस वापरलेले पदार्थ खाणे टाळा. तसेच, दुग्धजन्य पदार्थांवर पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी तुमच्या आहारात वनस्पती प्रथिने आणि तंतुमय भाज्यांचे सेवन वाढवा. पनीर मर्यादित प्रमाणात खा.
