जेव्हा तुम्ही टीव्हीवर लाइव्ह रिपोर्टिंग पाहता तेव्हा रिपोर्टींग करताना कॅमेऱ्याच्या पलिकडे काय घडतं याचा अंदाज प्रेक्षकांना येत नाही. खराब हवामान, पक्ष्यांपासून ते पिसाळलेले कुत्रे तर संतप्त नागरिकांपासून ते नाराज प्रेक्षकांपर्यंत या सगळ्याच गोष्टींचा पत्रकारांना सामना करत रिपोर्टींग करावं लागतं. कधी कधी संकट समोर असताना तशा परिस्थितीत परिस्थितीत रिपोर्टींग करावं लागतं. कारण ते थेट टेलिव्हिजनवर माहितीचा एक महत्त्वाच्या भागाचं प्रसारण होत असतं. वेस्ट व्हर्जिनियाच्या डनबारमधल्या एका टीव्ही रिपोर्टरसोबत असंच काहीसं घडलंय. या महिला पत्रकाराच्या दमदार रिपोर्टींगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा तिचं कौतुक कराल.

वेस्ट व्हर्जिनियातील एका महिला पत्रकारासोबत लाइव्ह रिपोर्टिंग करताना एक मोठी घटना घडली. जेव्हा ती स्टुडिओमध्ये अँकर टिमसोबत रस्त्यावर उभी राहून लाइव्ह रिपोर्टिंग करत होती. अचानक तिला एका कारने धडक दिली. अपघातानंतरही तिने ज्या पद्धतीने काम केलं ते पाहून सगळेच तिच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे.

boys did dangerous stunt with car to make reels video went viral on social media
रिल्ससाठी जीवघेणा स्टंट! मित्राला प्लास्टिकच्या रॅपरमध्ये गुंडाळले अन् चालत्या कारच्या बाहेर…
nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

आणखी वाचा : ‘त्या’ टांझानियन तरूणाचा आता ‘Srivalli’ गाण्यावर डान्स VIDEO VIRAL, चाहते म्हणाले, ‘अल्लू अर्जुनही खुश…’

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की, योर्गी डनबर वेस्ट व्हर्जिनियामधील डनबार येथून लाइव्ह रिपोर्टींग करत असल्याचं दिसत आहे. त्यानंतर तिच्या बाजुने भरधाव वेगात येणाऱ्या एका कारने तिला मागून जोरदार धडक दिली आणि ती जमिनीवर पडली. पण यादरम्यान तिने आपली रिपोर्टींग मात्र थांबवली नाही. अपघातानंतरही ती पुन्हा उठली आणि कॅमेऱ्यासमोर आली. पण तोपर्यंत ती बोलतच राहिली.

कारने धडक दिल्यानंतर काही सेकंदांनी, योर्गी बोलताना दिसतेय की, “मला नुकतीच एका कारने धडक दिली, पण मी ठीक आहे, टिम”. या घटनेदरम्यान ज्या महिला चालकाने योर्गीला धडक दिली होती तिने तिची प्रकृती देखील विचारली. तिने विचारले तू ठीक आहेस ना? तर योर्गीने उत्तर दिले की, “होय मी पूर्णपणे ठीक आहे.” या घटनेनंतर योर्गी पुन्हा कॅमेऱ्यासमोर आली आणि म्हणाली, मला नुकतीच एका कारने धडक दिली, पण मी नशीबवान आहे की मी पूर्णपणे बरी आहे. अँकरने योर्गीलाही विचारले की, “तू ठीक आहेस का?”

आणखी वाचा : संतापलेल्या नवरीने ८ लाख रुपयांचे ३२ वेडिंग गाऊन कापले, पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ टिमोथी बर्क नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. ही क्लिप ३६ लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे आणि २८ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. रिपोर्टरचे कौतुक करताना, एका युजरने म्हटले, “टोरी योर्गी, आज मी २०२२ मध्ये टेलिव्हिजनवर पाहिलेली सर्वात सकारात्मक गोष्ट आहे.”

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बाबो! एक नव्हे दोन सिंहांसमोर छातीठोकपणे उभा राहिला हा माणूस, लोक ओरडत राहिले पण…

आणखी वाचा : Viral Video : अशी शिकवण्याची पद्धत तुम्ही कधीच पाहिली नसेल, बघून पोट धरून हसाल!

काही युजर्सनी तर यावर योर्गीच्या धाडसांचं कौतुक केलंय. अपघातानंतर रिपोर्टींग बंद करून कॅमेरा कट करणे अपेक्षित होते. परंतू तसं काहीही न करत ती पुन्हा उठली आणि रिपोर्टींग करू लागली हे पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. या ट्विटमध्ये एका व्यक्तीने म्हटले, “तिला अपघातात खाली पडल्यानंतर कॅमेरा कट का नाही केला? तिने आपलं काम सुरूच ठेवलं हे एक उत्तम काम केलंय. तिला एका कारने धडक दिली आणि अपेक्षा होती की ती तक्रार करत राहील.”

हफिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, अपघातानंतर योर्गीला ईआरमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. अहवालात म्हटले आहे की, योर्गी एकटीच काम करत होती आणि लाइव्ह सेगमेंटसाठी सर्वकाही हाताळत होती. यामध्ये अपघातादरम्यान कॅमेरा पडल्यानंतर त्यांनी स्वत: तो दुरुस्त केला.”