VIRAL VIDEO : सारखी ड्रेसिंग, सारखे हावभाव देत जुळ्या बहिणींनी ‘Manike Mage Hithe’ गाण्यावर केला ‘सेम टू सेम’ डान्स

‘Manike Mage Hithe’ या गाण्याची क्रेझ इतकी वाढलीये की लोक या गाण्यावर आपले डान्स व्हिडीओ आणि वेगवेगळ्या भाषेतली वर्जन आणू लागली आहेत. या गाण्यावरचा दोन जुळ्या बहिणींचा डान्स आता सोशल मीडियावर आगीसारखं पसरू लागलाय.

twins-dance-on-Manike-Mage-Hithe
(Photo: Instagram/ surabhi.samriddhi)

श्रीलंकन ​​गायिका योहानी डिलोका डी सिल्वा हिने गायलेलं ‘मनिके मागे हिते’ या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय. अगदी लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत, बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते सामान्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडी हे गाणं दिसून येतंय. हे गाणं श्रीलंकन असलं तरी भारतात मात्र या गाण्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. या गाण्याचे बोल कुणाला समजले नसले तरी या गाण्याच्या संगीताने लोकांची मनं जिंकली आहेत. या गाण्याची क्रेझ इतकी वाढलीये की लोक या गाण्यावर आपले डान्स व्हिडीओ आणि वेगवेगळ्या भाषेतली वर्जन आणू लागली आहेत. या गाण्यावरचा दोन जुळ्या बहिणींचा डान्स आता सोशल मीडियावर आगीसारखं पसरू लागलाय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या जुळ्या बहिणींचा सेम टू सेम डान्स पाडून सारेच जण आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडीओमध्ये दोघा बहिणींनी कमालच केलीय. दोघींचा मेकअप, ड्रेसिंग, हावभाव अगदीच सारखे आहेत. त्यांच्या याच सारखेपणाची सध्या चर्चा होतेय. या दोघी बहिणी इन्स्टाग्रामवर खूपच फेमस आहेत. या दोघींचं नाव सुरभी आणि समृद्धी असं असून त्या सोशल मीडियावर ‘चिंकी-मिंकी’ नावाने ओळखल्या जातात. एकाच अकाऊंटवरुन त्या दोघी वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ अपलोड करतात. त्यांनी अपलोड केलेले व्हिडीओज आणि फोटो नेहमी चर्चेचा विषय ठरतात. आपल्या सारख्या दिसण्याचा फायदा उचलत त्यांनी चांगलंच डोकं वापरलंय. सध्या सोशल मीडियावर ट्रेंडवर असलेल्या ‘मनिके मागे हिते’ या गाण्यावर केलेला सेम टू सेम डान्स लोकांना खूप आवडलाय. यामध्ये या दोन्ही बहिणी सारखेच हावभाव करताना दिसतायत. हा व्हिडीओ एकदा पाहाच.

सुरभी आणि समृद्धी या दोघींनी एकदम हुबेहुब डान्स स्टेप्स केल्यामुळे सगळेच अवाक् झाले आहेत. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये दोन्ही जुळ्या बहिणींनी हुबेहुब मेकअप आणि ड्रेसिंग केलं आहे. त्यांच्या हातातील ब्रेसलेटसुद्धा साऱखे आहे. नेल पॉलिशसुद्धा साऱखेच आहे. इतकंच काय तर त्यांनी पायात घातलेले सॅण्डल्स सुद्धा सेम टू सेम आहेत. त्यामुळे व्हिडीओमध्ये दोन बहिणी नसून त्या एकच असल्याचा भास होऊ लागतो. व्हिडीओमधील दोघींचे एक्सप्रेशन आणि डान्स मूव्ह पाहून सगळ्यांचंच लक्ष वेधलं आहे.

आणखी वाचा : दोघांत तिसरा? ‘टायटॅनिक’ फेम अभिनेत्यासोबत गर्लफ्रेंडच्या ‘त्या’ VIRAL VIDEO वर अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस म्हणाले…

आणखी वाचा : Photos : दिल्लीत अवतरलं ‘काश्मीर’सारखं सौंदर्य! नयनरम्य नजारा, ढगांची चादर…VIRAL PHOTO पाहून भरेल हुडहुडी

या दोघी जुळ्या बहिणी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून वेगवेगळ्या टीव्ही शोमध्ये कॉमिकसाठी लोकप्रिय आहेत. त्यांच्या इन्स्टाग्रामवर ९.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. या दोघींचा जन्म २७ डिसेंबर १९९८ रोजी नोएडा इथे झालाय. या दोघीही २२ वर्षाच्या असून सोशल मीडियावर त्यांची तगडी फॅन फॉलोइंग आहे.

‘मनिके मागे हिते’ या गाण्यावर त्यांनी केलेला सेम टू सेम डान्स सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओला आतापर्यंत ३.९ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले असून अनेकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. सोबतच हा व्हिडिओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हायरल होत आहे.

‘मनिके मागे हिते’ सतीशन रत्नायक यांचं गाणं आहे. मात्र, या गाण्याचं योहानी डिलोका डिसिल्वा हिच्या आवाजातील फिमेल व्हर्जन लोकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्याचे बोल ड्यूलन ए आर एक्सने लिहिले आहेत. आतापर्यंत या गाण्याला १७८ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Twin sisters dance to manike mage hithe in cute viral video from ahmedabad prp

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
ताज्या बातम्या