VIRAL VIDEO : जुळ्या बहिणींनी रिक्रिएट केलं ‘Squid Game’ मधलं पिंक सोल्जर गाणं

गेल्या सप्टेंबरमध्ये, OTT प्लॅटफॉर्म Netflix वर आलेल्या ‘स्क्विड गेम’ या वेब सीरिजने संपूर्ण जगाला वेड लावलंय. नुकतंच जुळ्या बहिणींचा यावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात दोघींनी ‘Squid Game’मधलं पिंक सोल्जर गाणं रिक्रिएट केलंय. पाहा हा व्हिडीओ…

twin-sisters-recreate-squid-games-song
(Photo: Instagram/ kiranandnivi)

गेल्या सप्टेंबरमध्ये, OTT प्लॅटफॉर्म Netflix वर आलेल्या ‘स्क्विड गेम’ या वेब सीरिजने संपूर्ण जगात दबदबा निर्माण केलाय. Netflix वर सर्वाधिक पाहिलेल्या या दक्षिण कोरियन सीरिजने सोशल मीडिया असो, मार्केट असो, क्रिप्टोकरन्सी असो की शेअर मार्केट, या मालिकेची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे. नेटफ्लिक्सवर २०२१ च्या वर्षात या सीरिजने नवा विक्रम रचलाय. ‘स्क्विड गेम’चा ट्रेंड अजुन संपण्याचं नाव घेत नाही. ज्याला बघावं तो या ‘स्क्विड गेम’ मधील पात्र बनून फिरू लागला आहे. नुकतंच दोन जुळ्या बहिणींनी या ‘स्क्विड गेम’मधल्या पिंक सोल्जर ट्रॅक रिक्रिएट करत एक व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या जुळ्या बहिणींची नावं किरण आणि निवी असं आहे. या जुळ्या बहिणींनी स्क्विड गेममधील लोकप्रिय गाणं ‘पिंक सोल्जर’ रिक्रिएट केलंय. यावेळी त्यांनी एक पोस्टर असलेलं आयपॅड हातात पकडलंय. सोबत ते या गाण्यावर लिप सिंक करताना दिसून येत आहेत. या जुळ्या बहिणींनी कमालीचे एक्सप्रेशन्स दिले आहेत. दोघींच्याही चेहऱ्यावर एकाच वेळेचा सारखे हावभाव पाहून आपण खरोखरंच ‘स्क्विड गेम’ पाहत असल्याचा भास होताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सर्वाचंच मनोरंजन करणारा ठरतोय. ही मूळ दक्षिण कोरियन वेबसिरीज असली तरी भारतात अशी सीरिज केली तर कशी असेल, याचा अंदाज नेटिझन्सनी लावण्यास सुरूवात केलीय.

आणखी वाचा : Bride Dance Video : स्वतःच्याच लग्नात नवरीने केला इतका जबरदस्त डान्स की लोक जोरजोराने ओरडू लागले…

आणखी वाचा : Baby Elephant Video: कसला क्युट आहे हा…! पाण्यात फुटबॉल खेळणाऱ्या हत्तीच्या पिल्लूचा VIDEO VIRAL

या व्हायरल व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडमध्ये ऐकू येणाऱ्या गाण्यामुळे हा व्हिडीओ आणखी मनाला भावतो आहे. या सीरिजशी संबंधित थ्रिलर किंवा सस्पेन्स या व्हिडीओमध्ये अगदी तसाच ठेवलाय, जसा मुळ सीरिजमध्ये दाखवण्यात आलाय.

या व्हायरल व्हिडीओने ‘स्क्विड गेम’ या सीरिजच्या लोकप्रियतेत आणखी नवी भर टाकलीय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतोय. ‘kiranandnivi’ नावाच्या या जुळ्या बहिणींचं इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ७१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. त्याचप्रमाणे या जुळ्या बहिणींनी केलेला हा प्रयत्न पाहून या व्हिडीओवरील कमेंट्स सेक्शनमध्ये कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडताना दिसतोय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Twin sisters recreate squid games pink soldier track in viral video internet is hooked prp

Next Story
VIDEO : ‘धीरे धीरे’ गाणे तेही संस्कृतमध्ये ऐकलेत का तुम्ही?
ताज्या बातम्या