scorecardresearch

Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांनी शेअर केला डॉक्टरांच्या बदलत्या हस्ताक्षरचा व्हिडीओ; हसून हसून तुमचेही पोट दुखेल

आनंद महिंद्रा यांनी डॉक्टरांच्या बदलत्या हस्ताक्षरचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांनी शेअर केला डॉक्टरांच्या बदलत्या हस्ताक्षरचा व्हिडीओ; हसून हसून तुमचेही पोट दुखेल
photo(twitter/anand mahindra)

Anand Mahindra Tweet: भारतातील प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा(Anand Mahindra) इंटरनेटवर खूप सक्रिय असतात. ते दररोज ट्विटरवर काही ना काही शेअर करत असतात. त्‍यामुळे त्यांच्या चाहत्यांना दररोज काही ना काही मजेदार, रंजक आणि प्रेरणादायी गोष्टी पाहायला मिळतात. त्यांनी शेअर केलेल्या प्रत्येक व्हिडीओ किंवा मजकूर अनेकांना आवडतो. आनंद महिंद्रा यांनी असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, जो पाहून सगळे हसत आहेत.

आनंद महिंद्रा यांचे व्हायरल ट्विट

आनंद महिंद्राने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्टरांचे बदलते हस्ताक्षर पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत महिंद्राने लिहिले की आनंददायक, पण खरे. सर्वप्रथम, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ तुम्हीही पाहावा.

( हे ही वाचा: Anand Mahindra tweet: आनंद महिंद्रा यांनी गणेशोत्सवानिमित्त शेअर केलेला व्हिडीओ एकदा पाहाच, दिवस आनंदात जाईल)

लोकांना त्यांचे हसू आवरता आले नाही

या व्हिडीओमध्ये, एमबीबीएस, पीजी, कनिष्ठ, वरिष्ठ आणि एमबीबीएस (MBBS) दहावी, अकरावी, बारावीच्या हस्ताक्षरात स्पष्ट फरक दिसून येतो. सुरुवातीला, सुंदर हस्ताक्षर खराब ते वाईट आणि नंतर सरळ रेषेत बदलते. त्याचप्रमाणे डॉक्टरांचे हस्ताक्षर समजून घेणे प्रत्येकाला जमतेच असे नाही.

( हे ही वाचा: Anand Mahindra Tweet: आनंद महिंद्रा यांचा नितीन गडकरींना थेट सवाल; मी बोगद्यातून जाणं पसंत करेन पण…)

हा खूप मजेदार व्हिडीओ आहे

ही पोस्ट ट्विटरवर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक आणि रिट्विट केले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्स त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसले. अनेकांना व्हिडीओमध्ये दाखवलेली गोष्ट बर्‍याच अंशी खरी वाटली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या