सोशल मीडियावर सतत काही ना काही मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता असाच एक अतिशय मजेशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हिडीओमध्ये व्हायोलिनच्या धूनवर एक गाय मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहे. एक प्रसिद्ध व्हायोलिन वादक एका गोठ्यात बांधलेल्या गाय आणि वासराचे मनोरंजन करण्याचा विचार करतो आणि त्यानंतर व्हायोलिन घेऊन तो गोठ्यात पोहोचतो. यावेळी त्याच्या हातातील व्हायोलिन बघताच गाय आणि तिची वासरं अगदी आनंदी होतात.
यावेळी तो व्यक्ती आपल्या भाषेत काहीतरी बोलून व्हायोलिन वाजवायला सुरुवात करतो. त्या व्यक्तीच्या हातातील व्हायोलिन अगदी सारंगी वाद्यासारखी दिसतेय. हा व्यक्ती व्हायोलिनवर कोणत्याही गाण्याची किंवा गझलीची नाही तर गायीच्या हंबरण्याची धून वाजवून दाखवतो. जे ऐकून गाय खूप आनंदी होते. आपला जवळचा हरवलेला मित्र सापडल्यासारखा तिला आनंद होतो. यावर गाय देखील आनंदात व्हायोलिनच्या धूनमध्ये हंबरू लागते.
यानंतर तो व्यक्ती व्हायोलिनची धून थोडी मंद करतो. यावर गाय देखील व्हायोलिनच्या धूनला कॉपी करत हंबरते. हे ऐकून ती व्यक्ती पुन्हा जोरात व्हायोलिनच्या धूनवर गायीचा आवाज काढते. हे ऐकून वासरू आणि गाय दोघेही एकत्र हंबरतात. हे ऐकून सगळे जोरजोरात हसायला लागतात. हा व्हिडिओ खूपच मजेदार आहे. ट्विटरवर ‘फन व्हायरल विड्स’ नावाच्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत १५ हजारांहून अधिक व्हूज आहेत. तर शेकडो लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे. तर काही लोकांनी कमेंट करून गायीची स्तृती केली आहे. एका यूजरने लिहिले – ही व्यक्ती व्हायोलिन खूप छान वाजवते.
यापूर्वी सोशल मीडियावर गाईचा असाच एक व्हिडिओही शेअर करण्यात आला होता. त्या व्हिडिओमध्ये एक गाय आणि वासरू पाणीपुरी खाताना दिसत होते. दोघीही अगदी माणसांप्रमाणे पाणीपुरी चव चाखत होत्या. तो व्हिडीओ देखील लोकांना खूप आवडला होता.
