scorecardresearch

अजब प्रेम की गजब कहाणी : Best Friends एकाच मुलीच्या प्रेमात पडले; तिने दोघांनाही होकार दिला अन्…

या दोघांनाही तिच्याकडून बाळ हवं आहे

अजब प्रेम की गजब कहाणी : Best Friends एकाच मुलीच्या प्रेमात पडले; तिने दोघांनाही होकार दिला अन्…
(फोटो Jam Press आणि Twitter/CoolFMNigeria आणि वरुन )

चांगले मित्र म्हणजेच बेस्ट फ्रेण्ड हे अनेक गोष्टी एकत्रच करतात. म्हणजे भटकंती असो किंवा कुठे बाहेर खाण्याचा प्लॅन असो तुमचा बीएफएफ तुमच्या सोबतच असतो. मात्र ब्राझीलमधील दोन बेस्ट फ्रेण्डने आपल्या मैत्रीबरोबरच प्रेम प्रकरणामध्येही शेअरींग इज केअरींग अशी भूमिका घेतली आहे. सध्या या दोघांबरोबरच त्यांच्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीही जगभरात चर्चेचा विषय ठरतेय.

नक्की वाचा >> PPE सूट फाडून नर्सने करोना रुग्णासोबत केला सेक्स

झालं असं की ४० वर्षीय डिनो डीसोझा आणि त्याचा ३० वर्षीय मित्र साओलो गोम्स हे दोघेही ब्राझिलमधून भटकंतीसाठी २०१९ साली बार्सलोनाला गेले होते. तेथे या दोघांची भेट बेलारुसच्या ओल्गा या २७ वर्षीय तरुणीशी झाली. आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर भटकंतीसाठी आलेल्या ओल्गाच्या दोघेही एकाचवेळी प्रेमात पडले. दोघांनाही यासंदर्भात एकमेकांना सांगितलं. मात्र ओल्गासमोर आपल्या प्रेमाची कबुली आधी कोण देणार यावर त्यांचं एकमत होऊ शकलं नाही. तसेच त्यांना आपली मैत्रीही प्रिय असल्याने दोघांनी एकाच वेळेस तिच्यासमोर प्रेमाची कबुली देण्याचं ठरवलं. विशेष म्हणजे त्यांचा हा निर्णय थोडा चमत्कारिक असला तरी त्यानंतर घडलेली गोष्ट आणखीन आश्चर्यात टाकणारी ठरली. ओल्गाने दोघांनाही होकार दिला आणि ती दोघांच्या संमतीने दोघांनाही एकाच वेळेस डेट करु लागली.

नक्की वाचा >> शवपेट्यांच्या जाहिरातीत अर्धनग्न मॉडेल्स, चर्चने व्यक्त केली तीव्र नाराजी

मागील दीड वर्षांपासून हे तिघं एकत्र आहेत. हे तिघेही वेगवेगळ्या रेस्तरॉमध्ये, चित्रपटगृहांमध्ये आणि पर्यटनस्थळी जात असतात. इतर जोडप्यांप्रमाणेच हे फिरतात मात्र दोघांऐवजी हे तिघं एकत्र असतात. आम्ही कधीच अशा नात्याचा विचार केला नव्हता. मात्र आमच्यातील नातं एवढं खास आहे की आम्ही सारं काही जुळवून घेतलं असं ते सांगतात.

सुरुवातीला या तिघांच्या नात्याबद्दल त्यांच्या घरच्यांना समजल्यानंतर त्यांना धक्काच बसला. हे नातं नक्की कसं आहे यासंदर्भात घरच्यांना समजावून सांगताना या तिघांची दमछाक झाली. मात्र घरच्यांनी त्याचं नातं स्वीकारलं. हे तिघेही सध्या एकत्र फ्रान्समध्ये राहतात. डेली मेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये डिनो आणि साओलो या दोघांनाही आपल्याला ओल्गाकडून मुलं हवं असल्याचं म्हटलं आहे. लवकरच हे तिघं बाळासंदर्भातील निर्णय एकमेकांच्या संमतीने घेणार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

नक्की वाचा >> पारदर्शक PPE किटमध्ये लाँजरी घालून उपचार करणारी नर्स झाली मॉडेल; नोकरीही मिळाली परत

नक्की वाचा >> लॉकडाउनचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मारला छापा; घरात ५० जण करत होते Sex Party

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-01-2021 at 18:10 IST

संबंधित बातम्या