Premium

Viral Video : चालत्या स्कूटीवर चक्क दोन तरुणांचा रोमान्स; किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल

हा व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या रामपूर येथील आहे. या व्हिडीओत चालत्या स्कूटीवर चक्क दोन तरुण एकमेकांना किस करताना दिसत आहेत तर तिसरा तरुण स्कूटी चालवत आहे.

two boys kissing on scooty romance video goes viral uttar pradesh rampur
(फोटो : ट्विटर)

सोशल मीडियावर कपल्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेक व्हिडीओमध्ये सार्वजनिक ठिकाणी कपल्सचा रोमान्सही पाहायला मिळतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण चालत्या स्कूटीवर किस करत आहे. विशेष म्हणजे या स्कूटीवर तिघे जण आहेत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हायरल व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या रामपूर येथील आहे. या व्हिडीओत चालत्या स्कूटीवर चक्क दोन तरुण एकमेकांना किस करताना दिसत आहेत तर तिसरा तरुण स्कूटी चालवत आहे. स्कूटीवरील दोन तरुणांचा रोमान्स पाहून नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : Bye शब्दाचा अर्थ माहितीये का? कुणालाही बाय बोलण्याआधी फुल फॉर्म जाणून घ्या

नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एका युजरने लिहिले आहे, ” OMG तिन्ही मुले आहेत, या कलियुगात काय काय पाहावं लागत आहे?” हे दोन तरुण समलैंगिक असल्याचेही बोलले जात आहे.

हेही वाचा : Viral Video : चालत्या कारच्या छतावर तरुणांची हुल्लडबाजी, मद्यपान आणि पुश-अप्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा पुढे काय झालं?


या संपूर्ण प्रकरणावर रामपूर पोलिसांनी गाडीची नंबरप्लेट स्पष्ट दिसत नसल्याचे सांगत या मुलांचा शोध सुरू आहे, असे सांगितले. सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहन ओळखण्यात येईल आणि लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करू, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 16:36 IST
Next Story
साप उंबरठ्यावर अन् चिमुकलीची एन्ट्री, हृदयाचे ठोके चुकवणारा हा Video पाहून व्हाल थक्क