scorecardresearch

Video: दोन सायकलस्वारांची समोरासमोर धडक; मग जे काय झालं ते पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

सोशल मीडियावर व्हिडीओचा भांडार आहे. मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात.

Cycle_Accident_Viral_Video
Video: दोन सायकलस्वारांची समोरासमोर धडक; मग जे काय झालं ते पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का (Photo- Viral Video Grab)

सोशल मीडियावर व्हिडीओचा भांडार आहे. मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असतात. या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांचं मनोरंजन होत असतं. त्याचबरोबर त्या खालच्या कमेंट्स लक्ष वेधून घेत असतात. असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. रस्त्यावर अपघात झाला किंवा गाडीला साधं खरचटलं तरी वाहन चालक एकमेकांशी वाद घालत भिडतात. असं दृष्य आपण अनेकदा पाहिलं असेल किंवा स्वत:ही कधीतरी भांडले असतील. मात्र व्हायरल व्हिडीओत दोन सायकलस्वार एकमेकांना समोरसमोर धडकतात आणि भांडण्याऐवजी एकमेकांना हात मिळवत पुढे जातात.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन सायकलस्वार रस्त्यावरून जाताना दिसत आहेत. दोघं वेगाने असल्याने त्यांचं नियंत्रण सुटत आणि समोरासमोर धडकतात. आता दोघांमध्ये मारामारी होईल, असं व्हिडीओ पाहताना वाटते. पण असे काहीही न होता दोन्ही सायकलस्वार एकमेकांशी हस्तांदोलन करून आपापल्या वाटेने निघून जातात. इतकंच नाही तर एक सायकलस्वार दुसऱ्या सायकलस्वाराच्या हाताचे चुंबन घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

हा मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओखाली नेटकरी मजेशीर कमेंट्स लिहीत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, ‘मला असं कुणी धडकलं असतं तर मी मारामारी केली असती, ही कृती तर माझ्या विचार करण्याच्या पलीकडे आहे’. तर दुसऱ्या युजर्सने “असं चारचाकी धडकल्यावर कराल का?”, असा प्रश्न विचारला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two cyclists accident video viral on social media rmt

ताज्या बातम्या