Two girl students dancing on bollywood song went viral: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी अशी लोकं अशाप्रकारचे व्हिडीओ करत असतात.
शाळा, क्लास हे विद्येचे मंदिर मानले जाते. परंतु, आजकाल अभ्यास सोडून विद्यार्थी अशा ठिकाणीही थिल्लरपणा करू लागले आहेत. सध्या व्हायरल होणारा एक व्हिडीओ याचं उत्तम उदाहरण आहे.
हेही वाचा… आली गवर आली…सोनपावली आली! चिमुकलीने गायलं गौराईसाठी गाणं, VIDEO पाहून कराल कौतुक
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात दोन मुली भरवर्गात बाकीच्या विद्यार्थ्यांसमोर एका बॉलीवूड गाण्यावर डान्स करताना दिसतायत.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
‘स्त्री-२’ चित्रपटातील “आज की रात मजा हुस्न का…” या गाण्यावर दोन मुलींचा डान्स व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. या व्हिडीओत दोघीजणी या गाण्याची हुक स्टेप करताना दिसतायत. भरवर्गात सगळ्या विद्यार्थ्यांसमोर या दोघी थिरकताना दिसतायत.
डान्स करणाऱ्या या मुली ॲलन कोचिंग सेंटरमधील (Allen coaching center) आहेत, अशी शंका व्यक्त केली जातेय. कारण त्यांनी हिरव्या रंगाचं टी-शर्ट आणि काळी पॅंट घातली आहे, जो ॲलन इन्स्टिट्यूटच्या गणवेशाचा भाग आहे.
हा व्हिडीओ @log.kya.kahenge या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला काही वेळातच तब्बल पाच लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत.
यूजर्सच्या प्रतिक्रिया (Users Comments)
हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “वाह, आई-वडिलांचे पैसे चांगल्या ठिकाणी वाया जातायत”, तर दुसऱ्याने “आजकालच्या सुशिक्षित मुली”, अशी कमेंट केली. तर एक जण म्हणाला, “ही नक्की शाळा आहे की हा डान्सबार आहे, आजकालची पिढी कुठे चालली आहे कळतंच नाही.“
हेही वाचा… गणपती बाप्पाचा नटखट भक्त! मूर्तीजवळ आला आणि हातातला मोदक पळवला; श्वानाचा VIRAL VIDEO एकदा पाहाच
दरम्यान, शाळा-कॉलेजमधले अशाप्रकारचे डान्सचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. फक्त काही लाईक्स आणि कमेंट्ससाठी आजकाल काही मुलं मर्यादा ओलांडू लागले आहेत.