सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही आपणाला हसवणारे असतात तर काही थक्क करणारे असतात. तर काही व्हिडीओ लोकांच्या भांडणाचे असतात, जे पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करतात. सध्या बिहारमधील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बुरखा घातलेल्या काही शाळकरी मुली रस्त्यावर एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत.
व्हिडीओती दोन्ही मुली शालेय विद्यार्थिनी असून प्रियकरावरुन या दोघींमध्ये वाद झाला आणि त्यांनी एकमेकींना मारहाण केल्याचा दावा करण्यात येत आहे. पाटणा येथील सिवानच्या बाजारात हा हाय वोल्टेज ड्रामा झाला, तर या मुलींची भाडणं पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमल्याचं व्हिडीओत दिसत आहे.




मुलींमधील या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक या भांडणावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत, तर काहीजण याला महिला सक्षमीकरण म्हणत मिश्कील टिप्पणी करताना दिसत आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
मुलींच्या भांडणावर कमेंट करताना हरीश नावाच्या ट्विटर युजरने लिहिलं, “आपल्या देशातील मुली मुलांपेक्षा कमी आहेत का?” तर दुसऱ्या एकाने लिहिलं “एक महिला दुसऱ्या महिलेला मारहाण करत आहे आणि तिसरी महिला त्याचे रेकॉर्डिंग करून मजा घेत आहे.” तर तिसऱ्याने लिहिलं, “मुली भांडत आहेत आणि लोक तमाशा बघतबसले आहेत, कोणी ही भांडण थांबवत का नाही?”