Premium

भररस्त्यात बुरखा घातलेल्या शाळकरी मुली एकमेकींशी भिडल्या, बाजारातील हाणामारीचा व्हिडिओ होतोय VIRAL

बुरखा घातलेल्या शाळकरी मुलींनी रस्त्यावर एकमेकींना मारहाण केल्याचा व्हिडिओ VIRAL होतोय.

Fighting between girls Viral Video
बुरखा घातलेल्या मुलींच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल. (Photo : Twitter)

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही आपणाला हसवणारे असतात तर काही थक्क करणारे असतात. तर काही व्हिडीओ लोकांच्या भांडणाचे असतात, जे पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करतात. सध्या बिहारमधील असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बुरखा घातलेल्या काही शाळकरी मुली रस्त्यावर एकमेकींना मारहाण करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओती दोन्ही मुली शालेय विद्यार्थिनी असून प्रियकरावरुन या दोघींमध्ये वाद झाला आणि त्यांनी एकमेकींना मारहाण केल्याचा दावा करण्यात येत आहे. पाटणा येथील सिवानच्या बाजारात हा हाय वोल्टेज ड्रामा झाला, तर या मुलींची भाडणं पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

हेही पाहा- पुलावर फोटो काढण्यासाठी गेली मुलं, अचानक रेल्वे आल्यामुळे मारल्या उड्या…, VIDEO पाहून अंगावर येईल काटा

मुलींमधील या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक या भांडणावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत, तर काहीजण याला महिला सक्षमीकरण म्हणत मिश्कील टिप्पणी करताना दिसत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

मुलींच्या भांडणावर कमेंट करताना हरीश नावाच्या ट्विटर युजरने लिहिलं, “आपल्या देशातील मुली मुलांपेक्षा कमी आहेत का?” तर दुसऱ्या एकाने लिहिलं “एक महिला दुसऱ्या महिलेला मारहाण करत आहे आणि तिसरी महिला त्याचे रेकॉर्डिंग करून मजा घेत आहे.” तर तिसऱ्याने लिहिलं, “मुली भांडत आहेत आणि लोक तमाशा बघतबसले आहेत, कोणी ही भांडण थांबवत का नाही?”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two girls clashed on the road there was a fierce fight in the crowded market video went viral jap

First published on: 26-09-2023 at 17:22 IST
Next Story
VIDEO: लालबागच्या गर्दीत अडकला “आयुष्मान खुराना”; राजाच्या दरबारात प्रवेश करताच झालेला प्रकार कॅमेरात कैद