Viral video: कोणतंही काम सोपं नसतं, पण इच्छाशक्ती प्रबळ असल्यास, कोणतंही कार्य सोपं होऊ शकतं. एक काळ होता, जेव्हा डान्स करणारी किंवा गाणं गाणारी लहान मुलं फार कमी दिसायची. परंतु, सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता लहान मुलांचे असंख्य व्हिडिओ पाहायला मिळतात. यामुळे त्यांच्या टॅलेंटला एक मोठं व्यासपीठ मिळालं आहे.
लहान मुलांचे अनेक व्हिडिओमध्ये ते आपली कला दाखवत आहेत आणि सर्वांनाच त्यांच्या टॅलेंटने आश्चर्यचकित करत आहेत. सध्या एका अशाच दोन चिमुकलींचा डान्स व्हायरल होतोय. या चिमुकलींनी आपल्या नृत्याच्या टॅलेंटने सर्वांना थक्क केलं आहे. जगभरात एकापेक्षा एक डान्सर्स आहेत. कथ्थक, भरतनाट्यम, बॉलिवूड, हिपहॉप, बेली इथपासून अगदी वरातीत केल्या जाणाऱ्या गणपती डान्स पर्यंत तुम्ही म्हणाल तो डान्स फॉर्म करून दाखवतील असे जबरदस्त डान्सर्स आहेत. बरं, हे डान्स तुम्ही सोशल मीडियावर सर्रास पाहू शकता. असे शेकडो व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. पण हे सर्व अनुभवी डान्सर्स सुद्धा फिके पडतील अशी एक लावणी व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तुम्ही देखील एकदा पाहाच. या चिमुकलींचे एक्सप्रेशन्स पाहून तुमचं हृदय सुद्धा विरघळून जाईल.
“मी मोसंबी मी नारंगी” हे १९८१ च्या ‘मोसंबी नारंगी’ या मराठी चित्रपटातील प्रसिद्ध लावणी/गाणे आहे, जे अनुराधा पौडवाल आणि उत्तरा केळकर यांनी गायले आहे. याच गाण्यावर या दोघींनी जबरदस्त असा ठेका धरला आहे. लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान…या लावणीच्या माध्यमातून अनेक अदाकारांनी भल्याभल्यांना पायातील घुंगराच्या तालावर नाचवलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून लावणी महाराष्ट्रातील लोकांचं मनोरंजन करत आली आहे. अलीकडच्या काळात लावणी देशातच नाही तर परदेशातही पोहोचली आहे. विदेशातील अनेक नृत्यांगणा महाराष्ट्रात येऊन लावणी शिकतात, तिचा अभ्यास करतात. काळानुसार लावणी बदलत गेली. समृद्ध होत गेली. अलीकडच्या काळात तर लावणी थेट डिजेवर सुद्धा वाजत आहे. अशाच एका चिमुकलीची जबरदस्त लावणी सध्या व्हायरल होत आहे. या चिमुकलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकुळ घालत आहे.
पाहा व्हिडीओ
या चिमुकलीचा डान्स, पेहराव आणि श्रृगांर पाहून तुम्हीही म्हणाल की हे अस्सल मराठी सौंदर्य आहे. लावणी म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते ठसकेबाज नृत्य आणि लावण्यवतीची दिलखेचक अदा. या चिमुकलीनंही असंच सादरीकरण केलं आहे.
